पुन्हा एक धुमशान लगीन - एक राजेशाही थाटातला सोहळा

पुन्हा एक धुमशान लगीन - एक  राजेशाही थाटातला सोहळा 


गुजरा वो जमाना जब हम दोस्त की शादी मे जाया करते थे

अब बच्चोंके दोस्तोकी शादियो के मजे लुट रहे है ...

वक्त की नजाकत के ये गहरे रंगो से जिंदगी खिल रही है

हर लमहा गुजरे जमाने का हम  तरोताजा कर रहे है


गेल्या महिन्यात निशांत फारच व्यस्त होता, ऑफिसचे काम आटोपुन रोज खरेदी, कार्यक्रम, तयारी असं काहीतरी असायचं. त्याचा मित्र साहिल बागमार - निकिता मुनोत याचं लग्न ठरलं होतं. अचानक एका संध्याकाळी व्हाट्सअप वर निमंत्रण आलं ते होतं या विवाहाच्या निमित्ताने आयोजिलेल्या संगीत सोहळ्याचं.  तशी निमंत्रण तर येतच राहतात अन आपण जातोच असं नाही, पण त्या सोबतच फोन, आग्रह असा झाला अन जाऊ असं ठरलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक निमंत्रण व्हाट्सअप वर धडकलं ते होते त्याच विवाहाच्या स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी. 

आता मात्र जाणं क्रमप्राप्त होतं. 


कार्यालयीन कामकाज आटोपून मी सौ अनिता ला घेऊन लोणावळ्याला पोचलो अन पोचता क्षणी तिथल्या त्या भव्यदिव्य नियोजन आणि व्यवस्था पाहुन हरखून गेलो. साहिल चे बाबा आणि आई यांची भेट झाली..त्यांनीही आस्थेने चौकशी करुन विराजमान होण्यासाठी सांगुन त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाले. 


तसं तर सोहळ्याचे अनेक भाग होते.

Bhakti Sangeet Event - Garba , Bhajan , Dance Saamela/ Miravnuk) : Great Event 

 Lonavla Day 1

9:30 AM : Baarat Swaagat 

2:00 PM : Carnival ( Games , Dance )

6:30 PM : Sangeet

Lonavla Day 2

10:00 AM Phera : Best Entry

3:00 PM : Mahera Function

7:00 PM : Reception

या अगोदरही त्यांच्या मारवाडी रिवाजाप्रमाणे अनेक पारंपारीक कार्यक्रम होतेच, ज्यात मला आवडला तो म्हणजे मामाच्या गावाला जाऊन त्यांना कार्यासाठी बोलवणे. त्यालाही निशांत गेला होता,  अगदी मुलाचा भाऊ समजुन त्यांनी सामावुन घेतलं कारण ते कार्य ठरल्यापासून ते अगदी संपन्नता होऊन बारात घरी पोचेपर्यंत तो त्या कुटुंबाचा सदस्यच आहे इतके ते सारे, आणि निशांतचे अजूनही काही मित्र एकरूप होऊन गेले होते. तिथुन आल्यानंतर निशांतने जे वर्णन केलं ते ऐकुन मी भारावून गेलो. काय ते प्रेम, काय ती माया, काय तो नात्यांचा आदर, सन्मान, स्नेह. अगदी आजोबा, मामा, मामी, भावंडं यांचा तो प्रेमाचा सागर. सोबतच संस्कार आणि धार्मिक परंपरांचा यथेच्च सन्मान. हे सर्व ऐकल्यावर आम्ही निमंत्रित कार्यास जाण्याचं नक्की केलं. 


वर उल्लेखिलेल्या प्रत्येक समारंभाच विस्तृत वर्णन करत बसलो तर या लेखाचे दहा भाग होतील कदाचित. पण थोडक्यात मांडतो. 


बारात पुण्यातून निघुन लोणावळ्यात पोचताना मध्ये स्वागत, उपहार असं करत पोचली. पोचताक्षणी भरजरी मोत्यांच्या हारांनी, गुलाब पुष्प, पगडी, अत्तर, संगीत, आतषबाजी असं जोरदार स्वागत.  त्या नंतर स्विमिंग पूल च्या समोर घडलेला एक अनोखा हळदी चा कार्यक्रम, फ़क्त नैसर्गिक फुलांची उधळण, कुठलाही रंग नाही, अनोखे पेहराव, पाण्यात तरंगणारे अनेक कमलपुष्प , फुलं आणि तश्याच मोठ्या नैसर्गिकरित्या तयार फुलात सजलेला तो हळद समारंभ.  नातेवाईक, मित्र, मैत्रीणी, सगे सोयरे यांचे बहारदार नृत्य...प्रेम आपुलकी या रंगात न्हालेले व्याही मंडळी अन चैतन्यमय तो सोहळा संपन्न झाला...अन ते स्फुरण घेऊन ती मंडळी पून्हा त्यांना प्रत्येकाला दिलेल्या Villa मध्ये संगीत सोहळ्याकरिता नटण्यासाठी गेली. 


इकडे दोन तीन क्रिकेट मैदान एकत्र एवढा तो परिसर असा काही सजला होता की विचारु नका. हिंदी, मराठी award ला असतात त्याहूनही मोठा असा तो रंगमंच... एकावेळी 100 लोकं नाचु शकतील अगदी... समोर harness stands, दोन्ही बाजूला त्याच आकाराचे Truss आणि दिवे ....झगमगाट हा शब्द फिका पडावा आणि सभोवताली खानपान, व्यंजने यांचे अक्षरशः महाल...म्हणजे अथ पासून इति पर्यंत पोचायला अर्धातास चालावं लागेल....तुम्हाला खरं वाटणार नाही पण अडीचशे (250) पदार्थ होते त्या विविध महालात....प्रत्येक समुह, कुटूंबाला एक गोलाकार टेबल, त्यासाठी खास एक सेवा देणारा हसतमुख serving boy आणि प्रत्येक टेबलावर काय हवं, काय नको विचारण्यासाठी एक नटलेली, हसतमुख ताई जी अगदी आग्रह करून खाऊ घालत होती. आम्ही तर 10% त फुल्ल झालो. फळ, जूस, satrter अगदी देशी पंजाबी, दाक्षिणात्य, राजस्थानी, बंगाली, गुजराती...थोडक्यात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व प्रादेशिक खाद्य व्यंजनाचा कुंभमेळा, अन आंतरराष्ट्रीय पातळीवरची pizza, chinese, thai, italian, continental एवढे सारं अन ते ही शुद्ध शाकाहारी ....अरे बाप रे....


खरी कसरत होती की खावं मी संगीत सोहळा पहावा अशी द्विधा. कौटुंबिक प्रेमात अखंड न्हाउन निघणारा तो सोहळा, राघव शर्मा या नामांकित सूत्र संचालकाचं मजेशीर संचलन, भाऊ बहीण, सासू सून, व्याही, दिर नणंद, मेहुणा मेहुनी, यांचा सुंदर सांगीतिक आणि गमतीदार मिलाप, तेवढेच देखणे नृत्याविष्कार, रंजक किस्से, भव्य सेट आणि गण्यागणिक बदलणारे व्यासपीठ एक राजेशाही सोहळा... निशांत आणि मित्र यांचे बहारदार नृत्य....विलक्षण आनंद, बोचणारी थंडी, गरमागरम व्यंजने, आग्रह, दिव्यांचा झगमगाट....अहाहा. ,हे सर्व नियोजन साहिल ची बहीण संजना नी केलंय. अहो विशीच्या आतली ती पोर ती या समस्त विवाहाचे आयोजन करते ? अगदी choreographaer हो, ही सर्व मंडळी महिनाभर सराव करत होती, anchor शोधणे, खरेदी, पदार्थांची यादी, event management शी संपर्क, इतकं अफाट नियोजन असं लिलया पेलून त्याचा आनंदही लुटत होती. Hats off !! इतर कामात दिमतीला ही मित्र gang ही होतीच. बागमार साहेबांचे मित्र अगदी सखा भाऊ असावा असे तन मन लावून राबत होते. एवढा मित्र परिवार की ते त्या भव्य व्यासपीठावर माउच शकले नाहीत.   मनाचा फुललेला पिसारा घेउन आम्ही घरी निघालो, खरं तर तिथेच राहण्यासाठी समस्त बागमार मंडळी, साहिल चे मामा यांचा खूप आग्रह होता. 

जेवढा बागमार परिवार तेवढेच मुनोत ही त्याच हौशीने सर्व करत होते.  संगीत सोहळ्यासाठी हजारो लोक होते. 


दुसरे दिवशी, फेरे, महेरा असे विविध धार्मिक विधी त्याच नावीन्यपूर्ण शैलीत आणि आनंद, चैतन्यमय वातावरणात साजरे झाले. ऑफिस आटोपून मी अर्ध्यातून बायकोला pick up करून स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी पोचलो. कालची ती आरास पुर्ण बदलुन, नव्याने तो राजमहाल सजला, फुलं, दिवे, सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेहराव आणि तेवढेच पदार्थ आज पुन्हा... अरे बाप पोट आतुन ओरडायला लागलं, पण त्याची अन मनाची समजूत घालून रुचेल ते रिचवलं.  आज तर तीन चार हजार लोक असतील पण गर्दी, गोंधळ काहीही नाही, सर्व अगदी शांत, सुरळीत आणि मांगल्यपुर्ण लहरित साजरं होत होतं.  ती भव्यता आणि कौतुक करायला शब्द, वेळ यांचा मेळ बसविण्यात मी कमी पडेल कदाचीत....


एक गोष्ट भावली ती म्हणजे या ऐश्वर्यात अहंभाव सोडुन माणुसकी, आपुलकी, नात्यांचा ओलावा क्षणोक्षणी ठळक उमटत होता. बदलणाऱ्या काळात मैत्रीचा बंध तो ही कौटुंबिक धाटणीच्या वळणाने सजला, मित्राचं कार्य हे घरचंच समजुन निशांत ची झालेली आनंदी धावपळ आणि या निमित्ताने त्याची अनुभव शिदोरी परिपुर्ण झाली हा एक आई बाप म्हणुन आम्हाला झालेला आनंद वेगळा.  भरपूर फोटो आहेत, कारण 10 ते 15 फोटोग्राफर, 4 ते 5 videographer, ड्रोन असं सर्व सतत चमकत होतं, ते मिळायला अवकाश आहे.. तो वर हा शाब्दिक आनंद घ्या !!  समस्त बागमार, मुनोत परिवाराचे अभिनंदन आणि आभार.  राजू काका, ललित जी आणि दोनीही मामा तुम्ही विशेष अभिनंदनास पात्र आहात. संजना तू तर बहार   आणलीस, खूप कौतूक आणि अभिमान. भाउ बहीण सनी, सिद्धार्थ, पायल, अनुश्री, शुद्धी, उर्वी तुम्हीही बहार आणलीत. बाकी मित्राचं  भरत , प्रतीक, प्रसन्ना तर विचारूच नका... मौज मजा, धावपळ, मस्ती, गाड्या, घोडे अन प्रत्येक समारंभ गणिक नवा पेहराव करत असे काही सजले की विचारू नका.

साहिल और निकिता

बड़ी मुददतों के बाद आया है यह समां

आपको मुबारक हो खुशियों का यह जहां

सबकी दुआओं से भरा है आपका यह जहां

खुशियां बाटों एक दूजे के संग

रास आए आपको शादी का हर रंग!

 

तुमच्या लग्नाचं गिफ्ट म्हणुन प्रत्येक कार्यक्रमाची  रोज एक नवीन वस्तु भेट मिळाली त्याची संख्या ही लक्षात नाही, पण या दरम्यान मुलांना ज्या संस्कारांच्या समृद्ध अनुभूती दिली ती छान भेट, त्या ही पलीकडे जाऊन असं म्हणतो कालपरत्वे एकमेकास मदत करत कार्य संपन्न करण्यास श्री समर्थ असतातच पण ते बळ घेऊन सर्वार्थाने जगणं हा आपल्या विवाहसंस्थेचा कणा आहे आणि त्याचा भाग निशांत आहे हे पाहुन मन भरून पावलं.


शरद पुराणिक

090124 

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती