उपासना - चित्तशुद्धीचा सहज, सोपा मार्ग
अग्निसोम सेवा प्रतिष्ठान , संभाजीनगर यांच्या नववर्षाच्या दिनदर्शिकेत माझी गुरू सेवा म्हणून काहीतरी लिहिलंय ...या सोबत अनेक माहितीपर लेख ही आहेत. या माहितीचा प्रसार आणि परिचय व्हावा या करिता कृपया ही दिनदर्शिका मोफत घेऊन या सेवेत आपलीही सेवा द्यावी, ही विनंती !! त्या संभाजीनगर, पुणे, बीड येथे अनेक ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत !!
!! यज्ञ नारायण भगवान की जय !!
उपासना - चित्तशुद्धीचा सहज, सोपा मार्ग
एका काळात ही सृष्टी रानटी अवस्थेमध्यें जीवन जगत होती. त्यावेळी त्या रानटी अवस्थेमध्यें असलेल्या मानवाला जीवन व्यतीत करण्याचें मूलभूत शास्त्र अवगत झाले नव्हते. किंबहुना त्याचें ज्ञानहि नव्हतें. त्या काळांत त्यांना धर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? देव म्हणजे काय? आदींच्या कर्तव्याची ओळखसुद्धा नव्हती. केवळ देहधर्म व त्या देहधर्मपरत्त्वें देहाला जाणविणारी ज्या ज्या प्रकारची भूक किंवा इच्छा-वासना असेल ती पुरी करून जीवन व्यतीत करणें, इतकाच जीवनाचा अर्थ ते समजत होते. अशामुळे ह्या सृष्टीचे पावित्र्य लयाला जाण्याने, सृष्टीनिर्मितीचा जो परमेश्वराचा सद्हेतु जेव्हां अविकसित असा राहिला, तेव्हां परमेश्वराने स्वर्गलोकातून ऋषीजनांना या भूमीवर पाठवून, वेदवेदांत विद्येप्रमाणें यज्ञ-याग, जप-तप आदि साधनांचा उपयोग करून,या भूमीला योग्य असे पावित्र्य प्राप्त करून दिले. ही भूमि योग्यप्रकारे पवित्र झाल्यानंतर, भिन्नाभिन्न ठिकाणी आपली गुरुकुले स्थापन करून, लोकांना विद्याविद्यार्जन देऊन, त्यांना सज्ञान करण्याचा महान प्रयत्न केला. यांतूनच उपासना रूढ झाली.
तसं म्हणाव तर उपासना हा सहज सोपा मार्ग, म्हणाव तर अत्यंत कठिण मार्ग, म्हणजे श्वासाला जोडून तुमच्या श्रध्दास्थानाच नामस्मरण करण्याचा स्वतःचा प्रयत्न करनं हाच मार्ग आहे. असंख्य विचार येतात, नामस्मरण थांबवतात. नामस्मरण न थांबवता त्या विचारांच येण थांबवण्यात विजय मिळवण हाच मार्ग आहे. विचार येण बंद होऊन फक्त नाम येण हे साध्य झाल तर आपोआपच चित्त शुद्ध होते. चित्त शुध्द करण्यासाठी मग वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत.
उपासना :
उपासना म्हणजे श्रद्धेने किंवा भक्तिभावाने केलेले इष्टदेवतेचे चिंतन किंवा ध्यान, ही उपासना मंत्रोच्चार, प्रार्थना इ. स्वरूपाची असते. उपासना ही दोन प्रकारची : (१) कर्मांग व (२) पृथक. यज्ञ, होम, पूजा, भजन इ. देवताविषयक कर्मकांड आचरीत असता, मनोभावना ही उपासनात्मक असावी लागते. देवतेचे गुण, आकार, सामर्थ्य, चरित्र इत्यादिकांचे चिंतन उपासनेमध्ये चालवायचे असते. जप हा उपासनेचाच एक प्रकार आहे. प्रत्येक धर्मात साधना व आराधना या प्रकारचे कर्मकांड असते. साधना म्हणजे इष्टदेवतेच्या अनुग्रहाने इष्टफल प्राप्त करून घेण्याचे कर्मकांड. पुत्रप्राप्ती, शत्रुनिवारण, रोगनिवारण इ. विशिष्ट ऐहिक फलांच्या प्राप्तीकरिता सामर्थ्य मिळवून देणारे कर्मकांड ‘साधना’ होय. साधना ह्या शब्दात व्यापक अर्थाने क्वचित आराधनेचाही समावेश होतो. साधनेत कर्मकांडावर भर असतो व कर्मकांडात मोठी शक्ती आहे अशी श्रद्धा आहे. आराधना म्हणजे इष्ट देवतेची कृपा संपादन करून घेण्याचे कर्मकांड होय.
जप किंवा केवल ध्यान ही कर्म कांड नसलेली उपासना होय. ज्ञानयोग, भक्तियोग व ध्यानयोग या कर्मकांड विरहित उपासना आहेत.
उपासना ही जवळजवळ सर्व हिंदू अध्यात्मिक परंपरांच्या मध्यवर्ती पद्धतींपैकी एक आहे, पुष्कळदा उपासना किंवा ध्यान याला भाषांतरित केले जाते ते संस्कृत मूळ 'अप' आणि 'आसन' मधून आले आहे ज्याचा अर्थ 'जवळ बसणे' किंवा 'जवळ राहणे' आहे. उपासना ही ईश्वराच्या सान्निध्याचा सराव करण्याची आणि त्याच्यात विलीन होईपर्यंत त्याचे अस्तित्व हळूहळू अनुभवण्याची प्रक्रिया आहे.
'देवता उपासना' या वारंवार वापरल्या जाणार्या वाक्प्रचाराचा अर्थ एकतर देवतेच्या रूपावर सतत मन स्थिर करून देवता जवळ असणे किंवा मनाला निराकार ब्रह्माचे ध्यान करण्यास निर्देशित करणे, जो की सर्व प्रकटतेचा अवतार आहे आणि जो भिन्नभिन्न देवता म्हणून प्रकट होतात.
उपासनेमध्ये पूजन, आराधना, स्तुती, विनवणी, भक्ती, साष्टांग नमस्कार किंवा ध्यानधारणा यासारख्या एक किंवा अधिक क्रियांचा समावेश असू शकतो. उपासनेची क्रिया साधी प्रार्थना म्हणून किंवा विस्तृत समारंभाद्वारे, वैयक्तिकरित्या, अनौपचारिक किंवा औपचारिक गटात किंवा नियुक्त नेत्याद्वारे केली जाऊ शकते.
आता आपण ध्यान, पूजा आणि भक्ती या उपासनेच्या तीनही प्रवाहांमध्ये थोडे अधिक जाणून घेऊ या.
ध्यान म्हणून उपासना
उपासनेचा पहिला आणि प्राथमिक प्रवाह म्हणजे जप, अनुष्ठान, किंवा ध्यान. पूजा आणि भक्तीच्या आंतर-संबंधित परंतु भिन्न प्रवाहांमध्ये विकसित झाला तरी ही उपासनाने हा प्राथमिक अर्थ ध्यान म्हणून कायम केला आहे. इतिहास-पुराण-तांत्रिक-अगमिका परंपरांमध्येही ध्यानाला मध्यवर्ती स्थान मिळते.
ध्यान म्हणजे एक-बिंदू एकाग्रता किंवा ध्यानाच्या वास्तुसापेक्ष, मूर्ती, रूप किंवा त्या कल्पनेला साक्ष ठेऊन निश्चित केलेले ध्यान. उपासनेच्या बाबतीत, ध्यानाचा उद्देश ब्रह्म आहे, अनेकदा विविध चिन्हे, रूपक, नावे किंवा रूपे वापरून ध्यान केले जाते. विद्या उपासना किंवा देवता उपासनामध्ये ब्रह्माच्या कोणत्याही विशिष्ट पैलूवर एक अमूर्त मार्गाने किंवा अधिक वैयक्तिकृत पद्धतीने ध्यान करणे समाविष्ट आहे. विद्याचा शाब्दिक अर्थ 'जाणणे' असा होतो, तर देवता म्हणजे 'चमकणारा'. अशा प्रकारे, ते दोन्ही ज्ञानाशी संबंधित आहेत. तथापि, विद्या उपासना ब्रह्माच्या ज्ञानावर अधिक अमूर्त अर्थाने ध्यान व्यक्त करते असे दिसते, तर देवता उपासना अधिक ईश्वरवादी अर्थाने ज्ञानावर ध्यान करण्याचा अर्थ व्यक्त करते.
उपनिषदांनी उपासनेचे अनेक प्रकार सांगितले आहेत. ते म्हणतात की ब्रह्माचे ध्यान करणे आवश्यक आहे कारण ते विजेच्या लखलखाटसारखे आहे किंवा दैवी संदर्भात डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे आहे. अध्यात्मिका स्तरावर असे म्हटले आहे की, ज्याच्या दिशेने मन वारंवार जाते आणि वारंवार स्मरण करते असे ब्रह्माचे ध्यान केले पाहिजे.
पूजा म्हणून उपासना
उपासनेचा दुसरा प्रवाह, जो विशेषत: पौराणिक, अगमिका आणि तांत्रिक परंपरांमध्ये विकसित झाला, तो म्हणजे उपासनेला पूजा किंवा धार्मिक उपासना समजणे.
पूजेचा शाब्दिक अर्थ पूजा, आवाहन किंवा आदर दाखवणे असा होतो. पूजेची व्याख्या एक आध्यात्मिक कृती म्हणून करते जी मागील जन्मापासून वाहत असलेल्या कर्माच्या ओझ्याला शमवते, ज्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या चक्राचा अंत होतो आणि पूर्ण पूर्तता होते. महानिर्वाण तंत्र (8) नोंदवतो की पूजा म्हणजे जीव आणि आत्मा यांचे एकत्व.
पूजेचा व्यापक अर्थ आहे ज्यामध्ये केवळ एकाग्रता आणि ध्यानाचे अंतर्गत घटकच नाही तर बाह्य उपासनेचे घटक जसे की शुद्धीकरण (शुद्धी), दिव्यीकरण (न्यास), देवतेचे आवाहन (आवाहन) आणि विविध बाह्य अर्पण यांचा समावेश होतो. वस्तुतः, उपासनेचे बाह्य आणि अंतर्गत वर्गीकरण करते आणि पुढे बाह्य उपासनेचे वैदिक आणि तांत्रिक असे वर्गीकरण करते. उपासनेचे सर्वोच्च प्रकार ब्रह्म-चैतन्य अवस्थेत टिकून पुढे ध्यानाच्या अवस्थेत राहणे येते.
काही शुभ प्रसंगी, (वैदिक) यज्ञ तसेच (तांत्रिक) पूजा या दोन्हींचे प्रदर्शन आवश्यक होते. यज्ञ हे वेदांचे विशेष योगदान पूजा आणि तंत्र या साठी. वेद आणि तंत्र हे एकमेकांना पूरक आहेत.
अशा प्रकारे, वैदिक यज्ञ आणि तांत्रिक पूजा हे उपासनेचे पूरक बाह्य प्रकार आहेत जे उपासकाला उपासनेच्या उच्च ध्यानाच्या टप्प्यांवर नेण्यासाठी निर्मित केलेले आहेत.
भक्तियोग म्हणून उपासना
उपासनेचा तिसरा प्रवाह, ज्याचे मूळ उपनिषदांमध्ये आहे, परंतु इतिहास-पुराण परंपरेत, विशेषत: महाभारत आणि भागवत पुराणात त्याची वेगळी चव विकसित केली गेली आणि नंतर वेगवेगळ्या भक्तीपरंपरेने विस्तृत होत गेली ती म्हणजे उपासना भक्ती-योग म्हणून समजणे.
आपण जर पाहिलं तर उपनिषदे, ग्रंथ याचे सामुहिक वाचन, चिंतन होते. त्यातून समाज प्रबोधन ते होतेच या शिवाय त्या ध्वनी लहरींच्या साहाय्याने तिथला परिसर आणि योगायोगे त्या परिसरात वावरणारे जीव असे दोनीही अंतरबाह्य शुद्ध, शांत, संयमी होत जातात. त्यामुळेच आपल्या देशात भागवत सप्ताह, विष्णूपुराण, शिवपुरान, महाभारत, रामायण अशा ग्रंथांचे सामूहिक सोहळे होत राहतात. ही उपासना सर्वांग पद्धतीने फायदेशीर आहे. ज्यात तुम्ही स्वत्व विसरून भगवान चरणी लीन होता. या साधनेतून मिळणारा वयक्तिक फायदा कुठल्याही तराजूत मोजता येत नाही.
उपासना या शब्दाचे सेवा, वरिवस्या, परिचर्या, सुश्रुषा, औपासन असे अनेकविध अर्थ आहेत. उपासक, उपास्य आणि उपासना या तिघांचाही एकत्रित विचार यात केला जातो. आराधना करणे, अर्थात दीर्घकालपर्यंत आपल्या उपास्याच्या स्वरूप-गुणचिंतनामध्ये चित्तवृत्तीचा अखंडित प्रवाह ठेवणे. अर्थात, 'द्रुतस्य भगवत् धर्मात् धारावाहिकताङ्गता:। सर्वेषां मनसोवृत्ति भक्तिरित्याभिदीयते।।' असा उपास्य देवतेच्या संबंधाने निरंतर असणारा स्वरूप-गुण-लीलाचिंतनाच्या संबंधाने चित्तवृत्तीचा अखंड प्रवाह ज्याच्या ठिकाणी आहे, त्याला उपासक म्हणतात. उपासक, उपास्य आणि उपासना यांचे अनेक भेद आहेत. त्रिगुणानुसार सात्विक, राजस, तामस प्रकारच्या उपासना आहेत किंवा उपास्य देवतेच्या अनुसार वैष्णव, शैव, शाक्त, ब्राह्म, गाणपत्य इत्यादी भेद येतात. काल आणि स्थलसापेक्षतेनुसारही चातुर्मास्यादिक काळापुरती किंवा साधनद्वादशी व्रताची उपासना त्या दिवसांपुरती मर्यादित असते.
ज्याची उपासना करून अक्षय फलाची प्राप्ती होईल, असे नेमके 'उपास्य' काय असावे? लिंगपुराणात ब्रह्मा, विष्णू आणि रुद्राचेही जे निर्माते- जे निर्गुण, निराकार, निरंजन, निष्कल, परब्रह्म परमेश्वर परमात्मा आहेत, तेच या सर्वांचे उपास्य आहेत, असा उल्लेख आला आहे. त्यामुळेच व्यष्टी उपासनेत 'सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति।' असे म्हटले आहे.
'अहं हि सर्व संसारान् मोचको योगिनाम् इह। संसारहेतुरेवाहम् सर्वसंसार वर्जित:।' इत्यादी वचनांनुसार जगत्-जन्मादि कारणरूप, कार्यकारणातीत, एकमात्र परब्रह्म परमात्माच आहे, जे आम्हा सर्वांचे 'उपास्यदेव' ठरते. वास्तविक उपासना म्हणजे नित्यानंदस्वरूप परब्रह्म परमात्म्याच्या स्वरूपचिंतनामध्ये 'एकान्तिन प्रीति', अनन्यभाव प्राप्त करणे आहे; परंतु संपूर्ण जगाला मोहून टाकणारी परब्रह्म परमात्म्याचीच मलीन सत्वगुणप्रधान माया ही आपल्या वशीभूत असलेल्या जीवांना रज आणि तम या गुणांनी युक्त करीत मोहीत असते. जीवाने रज-तम भावांना नष्ट करण्यासाठी उपासनेचा आश्रय करून दृढतेने व अंत:करणपूर्वक करावी, असा आग्रह समर्थ रामदास स्वामी करतात
उपासनेला दृढ चालवावे |
भूदेव संतांसी सदा नमावे |
सत्कर्म योगे वय घालवावे |
सर्वा मुखी मंगल बोलवावे ||
सद्गुरू उपासना - सर्व श्रेष्ठ उपासना
सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हा गोंधळ न राहता सर्व चराचर श्रुष्टी व्यक्ती या सर्वां विषयी समभाव निर्माण होतो.
सृष्टीचा मुळ स्त्रोत आत्मा आहे. या आत्म्याच्या आत दडलेल्या व्यक्तीला त्याची ओळख वंदनीय सद्गुरु करतात. त्यासाठी गुरूला शरण जाऊन ज्ञानप्राप्ती करावी.
या उपासनेत मन काया वाचा यांच्यावर पवित्र, शुध्द, सात्विक संस्कार होतात. या मुळे व्यक्तीची अध्यात्मिक प्रगती, दीर्घायुष्य, आरोग्य व सर्व कार्यात यश प्राप्त होतेच आणि याद्वारे संसारात गुरुकृपेचा आंनददायी अनुभव प्राप्त होतो. उपासना आणि विद्वत्ता हे सोबत चालले तर आपले सर्वत्र रक्षण होते. व्यक्ती विद्वान तर असावीच, पण ती विद्वत्ता टिकवून ठेवणे हे महाकार्य आहे. यांतूनच समाज ही विद्वान, दिव्य आणि प्रगत होतो. फ़क्त गुरूचे चरणी माथा टेकवणे, पाया पडणे हे त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान असतो - त्यामुळे गुरुचरणी लिन होणे महत्वाचे आहे.
संसारात उपासना महत्वाची. सद्गुरु आणि गुरुजनांनी जे आचरण आणि गोष्टी सांगितल्या तो आपण जोपासून तोच आपला सत्यधर्म आहे. त्यामुळे जीवन आनंदमयी होते. पण तो आनंद उपसनेशिवाय प्राप्त होत नाही.
भगवंत भक्ती मार्ग हा उपासनेतच आहे. उपासनेत प्रेम, श्रद्धा, भक्तिभाव आवश्यक आहे. मनाची चंचलता थांबवण्यासाठी उपासना मदत करते. ज्या घरात भगवंत उपासना होते, ते घर म्हणजे मंदिर आहे, तिथे भगवंत आणि त्याचा वास असतो. चारित्र्य संपन्न, सुशिक्षित, सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी उपासना ही केलीच पाहिजे.
हा लेख अग्नीसोम तर्फे प्रकाशित होत असून आपण सर्व गुरुबंधू जे एका सर्वश्रेष्ठ गुरुपरंपरेस जोडलो गेलो आहोत त्या सद्गुरू घराण्याच्या उपासना या अतिश्रेष्ठ आहेत, अग्निहोत्र ज्या सेवेस 100 वर्षे पुर्ण झाली, तसेच पार्थिव शिवपूजन या ही उपासनेला 100 वर्षे पूर्ण झाली, त्या सोबत विश्वकल्याण या एकमेव हेतूने केलेले सोमयाग, सत्र सोमयाग. हे सर्व स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहेत. पण या समस्त उपासनेला, गुरूंच्या दिव्य कार्यास वंदन करून माझी ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो.
!! यज्ञ नारायण भगवान की जय !!
शरद पुराणिक
311223
Comments