Posts

Showing posts from 2024

माझा औंगाबाद ऋणानुबंध अन सुखावणारे क्षण...

 माझा औंगाबाद ऋणानुबंध अन सुखावणारे क्षण... या पूर्वी मी नोकरीनिमित्त विविध शहर आणि राज्यात भटकत भटकत अनंत अनुभव आणि त्याच्या गमती जमती एका लेख मालिकेत गुंफूल्या आहेत. आज ही आठवण झाली की वहितील झाकून ठेवलेले ते मोरपीस मी उघडुन पाहतो.  परवाच काही प्रासंगिक कार्यास उपस्थित राहण्यासाठी निघालो. गाडी चालवताना ते आठवांचे मोरपीस सारखे पिंगा घालत होते. माणुसकी, आपलेपण आणि जात धर्म या पलीकडे जाऊन एका  रेशमी धाग्यात गोवलेले ऋणानुबंध अनुभवताना होणारा आनंद शब्दात साठवता येत नाही, तरीही ती अनुभूती द्यावी असं राहून राहून वाटलं आणि त्यासाठी हा प्रपंच.  माझ्या प्रत्येक भेटीत मी यातील जसे जमतील तसे भेटीचे सोहळे घडवतो. वास्तविक ती यादी एवढी मोठी आहे की अशी एका लेखात समावणारी नाहीच. आलिशान परफ्यूमस - हे आमचं हक्काचं दुकान. हे तुमच्या रस्त्यात पडत नाही, तिथे मुद्दाम जावं लागत.  रोशन गेट वरून शहागंज भागात जाताना डाव्या हाताला ही छोटीशी सुगंधी अत्तराची एक दुकान. गेली 25 वर्षांहून अधिक काळ मी जो काही भला बरा दरवळलो तो याच दुकानातून घेतलेल्या विविध अत्तराच्या फाया ...हो फाया चा तो जमान...

भाग 2 - आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !!

 भाग 2 - आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !! खरं तर हे असे भाग लिहायची वेळ येउच नये, पण दुःखाचे हे दगड धोंडे असे येऊन आदळतात अन त्या जखमा खोल खोल होतात, आपण भेटुन सावरतो ही पन ते व्रण अनेकांची आयुष्य विद्रूप करतात. परवा एक घनिष्ठ मित्र असाच डाव अर्ध्यावर सोडुन निघून गेला. आयुष्याच्या सारीपाटावर एक सुंदर खेळ सजत असतानाच, त्या सोंगट्या तश्याच टाकून गेला.... संघर्षाची एक खेळी संपत येऊन सुख असं उंबरठ्यावर असतानाच हा निघून गेला. समोर दोन गोंडस मुलं, प्रेमळ बायको डावावर तसेच त्या सोंगट्या पसरलेल्या सारीपाटावर सुन्न .. काय सांत्वन करायचं, कोणी कोणाचं हे अनुत्तरित प्रश्न आ वासून त्या भयानक वातावरणात घोंघावत होते.  एक एक दिवस असले काही अनुभव सोबत घेऊन येतात ज्याला शब्दांत बसवणं आणि नेमक्या त्याच भावना पोचवणे ही कठीण ....पण व्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही ही अशी त्रेधातिरपीट होते. रोजच गंमत करत जगलं पाहिजे असं नाही, या गमतीलाही एक दुःखाची झालर बसते कधी, ती असतेच पण जाणवत नाही जोवर ती चमकदार रजई अंगावरून निसटत उघडे पाडते...चमक दूर होते अन लक्तर...

षडरात्र महासोमयाग - 16 जानेवारी ते 26 जानेवारी 2024

 षडरात्र महासोमयाग - 16 जानेवारी ते 26 जानेवारी  2024 श्री क्षेत्र नाझरे, ता. सांगोला  गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी इवलेसे रोप लावियेले द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी || प्रवर्ग्य फुलला सोमयाग बहरला | वाहता आहुती प्रेमभावें, अग्नी गगनी भिडला || वसुंधरे चे प्रेमे यज्ञीय सेवे देह अर्पियेला |! सृष्टीयेचे रक्षणी याग योजियेला || प्रवर्ग्य फुलला ...सोमयाग बहरला !!  माझ्या या पूर्वीच्या अनेक लेख मालिकेतून मी या कार्याविषयी भरपुर लिहिलं आहे. अगदीच ताजे संदर्भ द्यायचे झाल्यास खडकी (बीड) येथे पार पडलेला द्विरात्र अंगिरस सोमयाग,  SVYASA विद्यापीठ बेंगलुरु इथे पार पडलेला पशुकाम महासोमयाग यज्ञ सोहळा आणि  नंतर लगेच पुणे येथे सतत महिनाभर पार पडलेला दिव्य शिवपूजन सोहळा. त्या नंतर वृंदावन येथे पार पडलेला दशरात्र महासोमयाग... दोन वर्षांपूर्वी आलेला त्रिशताब्दी  अमृतयोग. मोठ्या महाराजांच जन्मशताब्दी वर्ष, सेलूकर घराण्याच्या अग्निहोत्र दीक्षेला ही 100 वर्ष आणि पार्थिव शिवपूजन सोहळ्याची ही...

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

 How do I say a Good Bye once for all Harish Sir  !!  Last two weeks have been only getting news of some or the other demise.  At times it is a father, mother of a friend or someone very close in the relation.  Not that am tired of attending the same, but one after the other the news are coming and you start thinking… Oh.. God whats wrong. More specific, when you have some emotional bond with the person himself or the relation that we have had with a friend.  Others pain is my pain is the learning imbibed in the body and I always get shocked by all such news. Yesterday, a similar news of a teacher who I am very fond off.  I always remember him in terms of the strict discipline, balance in life he maintained till his last breath and lived always on his own terms with no compromise to the principles he had set for his life.  Yes, I am talking of Prof. Harish Deshpande (Utikar) who was my teacher, mentor, guide, moral support in my college days....

पुन्हा एक धुमशान लगीन - एक राजेशाही थाटातला सोहळा

पुन्हा एक धुमशान लगीन - एक  राजेशाही थाटातला सोहळा  गुजरा वो जमाना जब हम दोस्त की शादी मे जाया करते थे अब बच्चोंके दोस्तोकी शादियो के मजे लुट रहे है ... वक्त की नजाकत के ये गहरे रंगो से जिंदगी खिल रही है हर लमहा गुजरे जमाने का हम  तरोताजा कर रहे है गेल्या महिन्यात निशांत फारच व्यस्त होता, ऑफिसचे काम आटोपुन रोज खरेदी, कार्यक्रम, तयारी असं काहीतरी असायचं. त्याचा मित्र साहिल बागमार - निकिता मुनोत याचं लग्न ठरलं होतं. अचानक एका संध्याकाळी व्हाट्सअप वर निमंत्रण आलं ते होतं या विवाहाच्या निमित्ताने आयोजिलेल्या संगीत सोहळ्याचं.  तशी निमंत्रण तर येतच राहतात अन आपण जातोच असं नाही, पण त्या सोबतच फोन, आग्रह असा झाला अन जाऊ असं ठरलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक निमंत्रण व्हाट्सअप वर धडकलं ते होते त्याच विवाहाच्या स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी.  आता मात्र जाणं क्रमप्राप्त होतं.  कार्यालयीन कामकाज आटोपून मी सौ अनिता ला घेऊन लोणावळ्याला पोचलो अन पोचता क्षणी तिथल्या त्या भव्यदिव्य नियोजन आणि व्यवस्था पाहुन हरखून गेलो. साहिल चे बाबा आणि आई यांची भेट झाली..त्यांनीही आस्थेने ...

अनोखे नववर्ष स्वागत ....इंडोवेस्टर्न - जोशी दा धाबा, भारतीय - कुलकर्ण्यांची सदनिका आणि "सासुरवाडी"

Image
 अनोखे नववर्ष स्वागत ....इंडोवेस्टर्न  - जोशी दा  धाबा, भारतीय - कुलकर्ण्यांची सदनिका आणि  "सासुरवाडी" माझ्या लिखाणावरून सर्वाना अस वाटत असेल कि मी प्रचंड फिरतो, अगदी देश पादाक्रांत करून झालाय... तर ती तुमची अंधश्रद्धा आहे.  मी खरं तर कुठेही जाण्यासाठी तयार असतो पण खाजगी नोकरी, सुट्यांची बोंब, आणि नेमकी जेंव्हा सुट्टी असते तेंव्हा हमखास काही तरी महत्वाचे कार्यालयीन कामकाज निघते आणि त्यावर पाणी, नाराजी आणि नैराश्येचे आवर्तन होऊन त्याच्या प्रवाहात त्या सुट्यांचा आनंद विसर्जित होतो... मागे राहतात त्याच कडू आठवणी. अर्ध आयुष्य लोटलं पण आम्ही प्रवासाची पावकी हि पार केली नाही हे सूर्यप्रकाशा इतक स्पष्ट.... असो या वरून तुम्ही समजून घ्या "भावना को समझो"  तश्याच सलग काही सुट्या गेल्या वर्षात शेवटच्या महिन्यात मागोमाग आल्या.. मनातल्या मनात अनेक मनोरे रचले आणि ते तसेच पत्त्याच्या डावासारखे कोसळत गेले अन आम्ही पुन्हा ते रचत गेलो... अशातच मित्रांचा सहज संदेश आला जो तसा नेहेमीच येतो. डिसेंबर च्या अखेरीस चर्चाना ऊत येतो, योजना तयार होतात आणि त्या आपल्यापर्यंत पोचता पोचता ल...

उपासना - चित्तशुद्धीचा सहज, सोपा मार्ग

 अग्निसोम सेवा प्रतिष्ठान , संभाजीनगर यांच्या नववर्षाच्या दिनदर्शिकेत माझी गुरू सेवा म्हणून काहीतरी लिहिलंय ...या सोबत अनेक माहितीपर लेख ही आहेत. या माहितीचा प्रसार आणि परिचय  व्हावा या करिता कृपया ही दिनदर्शिका मोफत घेऊन या सेवेत आपलीही सेवा द्यावी, ही विनंती !! त्या संभाजीनगर, पुणे, बीड येथे अनेक ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत !! !! यज्ञ नारायण भगवान की जय !!  उपासना - चित्तशुद्धीचा सहज, सोपा मार्ग एका काळात ही सृष्टी रानटी अवस्थेमध्यें जीवन जगत होती. त्यावेळी त्या रानटी अवस्थेमध्यें असलेल्या मानवाला जीवन व्यतीत करण्याचें मूलभूत शास्त्र अवगत झाले नव्हते. किंबहुना त्याचें ज्ञानहि नव्हतें. त्या काळांत त्यांना धर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? देव म्हणजे काय? आदींच्या कर्तव्याची ओळखसुद्धा नव्हती. केवळ देहधर्म व त्या देहधर्मपरत्त्वें देहाला जाणविणारी ज्या ज्या प्रकारची भूक किंवा इच्छा-वासना असेल ती पुरी करून जीवन व्यतीत करणें, इतकाच जीवनाचा अर्थ ते समजत होते. अशामुळे ह्या सृष्टीचे पावित्र्य लयाला जाण्याने, सृष्टीनिर्मितीचा जो परमेश्वराचा सद्हेतु जेव्हां अविकसित असा राहिला, तेव्हां...

नागदिवे ..कुलधर्म, कुलाचार अन बरंच काही

Image
 नागदिवे ..कुलधर्म, कुलाचार अन बरंच काही अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् । शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आणखी बरेच ठिकाणी ज्यांचं कुलदैवत खंडोबा, मल्हारी म्हाळसकांत, मल्हारी मार्तंड आहे  त्यांच्या घरी मार्गशीर्ष महिन्याच्या अगदी एक दिवस अगोदर, म्हणजे कार्तिक अमावस्येला खंडोबाचे षड रात्र घट बसवले जातात पाच दिवसासाठी. चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात. आता हे आमच्या घरी नाही तरीही थोडीफार माहिती आहे आणि माझ्या बहिणीकडे हे मोठया उत्साहाने केले जाते.  पण या दरम्यान होणारे नागदिवे हा उत्सव आमच्या कडे आहे. अमावस्येनंतर पाचवा  दिवस असतो त्या दिवशी नागदिवे करण्याची प्रथा आहे. घर व्यक्ती पर  प्रत्येकी पाच किंवा यथाशक्ती ते दिवे करतात. बाळ जन्माला आलं की त्याचं जसं नामकरण होतं तसंच यथावकाश त्याचा दिवा ही ठरतो, तो म्...

झंपर - चोळी अन टेलर ची दिवाळी

 झंपर - चोळी  अन टेलर ची दिवाळी काल घरगुती कामासाठी सौ सोबत गेलो अन गेले कित्येक दिवस डोक्यात घोळत होता तो विषय आज उतू आला ...लेडीज टेलर... पूर्वी हा उद्योग (ब्लॉउज शिवणे)  घरातच होत असल्याने याचा फार उहापोह नव्हता.  पण मग हळूहळू गल्लीत एक ताई किंवा काकु स्वतःसोबत इतरांचेही शिवणकाम करू लागली आणि याची व्याप्ती वाढली. अन नंतर काही पुरुष मंडळी ही यात उतरले आणि आज "लेडीज टेलर" हा एक स्वतंत्र व्यवसाय झालाय. त्याचा व्यास आणि परिघ हा शहराच्या क्षेत्रफळाच्या काईक वर्ग जास्त आहे.  एकतर तरुण,  पुरुष मंडळी ही तयार कपड्यांच्या ब्रँड मध्ये अशी काही गुंग झाली तसतसे जेन्ट्स टेलर ला फार काही चांगले दिवस सध्या तरी नाहीत. अगदी मोजके लोक कपडा घेऊन शिवायला टाकणारी आहेत पण लेडीज टेलर च्या व्यासापेक्षा अगदीच नगण्य अशी ही संख्या आहे.  आता रेडीमेड झंम्पर ही मिळतं पण एकंदरीत "matching" च्या विश्वात त्याला तसूभरही स्थान नसल्याने ते अगदीच "sos" तातडीच्या वेळी, वेळ मारुन नेण्यासाठीचा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे जगात विकत घेतल्या गेलेल्या साडीला लेडीज टेलर ची मु दिखाई ही क्रमप्राप...

आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !!

आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !! एक एक दिवस असले काही अनुभव सोबत घेऊन येतात ज्याला शब्दांत बसवणं आणि नेमक्या त्याच भावना पोचवणे ही कठीण ....पण व्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही ही अशी त्रेधातिरपीट होते. रोजच गंमत करत जगलं पाहिजे असं नाही, या गमतीलाही एक दुःखाची झालर बसते कधी, ती असतेच पण जाणवत नाही जोवर ती चमकदार रजई अंगावरून निसटत उघडे पाडते...चमक दूर होते अन लक्तरे जीर्ण वाटावी अशीच काहीतरी भावना असते हो सुखदुःखाच्या लपंडावात असा जोरदार धप्पा पडतो अन राज्य तुमच्यावर येतं. आज दिवस साला या वाढत्या वयात जबाबदारीच्या सुरपारंब्या आवळण्यात गेला जेंव्हा आधार वड च नाही राहिले हो.   काल एक बातमी धडकली आमचे एक काका अचानक हे जग सोडुन गेले.... खरंतर एक धष्टपुष्ट व्यक्ती, आयुष्यभर कष्ट केलेल शरीर त्यांना काही आजार होऊ शकतो हे कल्पनेपलीकडॆ.... पण अचानक मेंदु वर अपुऱ्या रक्तपुरवठ्याने घात केला अन सर्व संपलं.  वरचेवर ज्येष्ठ सदस्यांची ही कमी कमी होत जाणारी संख्या आणि त्यासोबतच कुटुंबातील निर्माण होणारी दरी ...ती निर्माण होत नसते पण खेळ मनाचा...

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः!!

Image
 मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः!! आयुष्यात काही प्रचंड भारावलेले, मंतरलेले आणि दिव्य अनुभूती देणारे दिवस असतात. ते असे अचानक तुमच्या झोळीत येऊ पाहतात. ते तुमच्या भिक्षावळीत येणे न येणे हे तुमचे प्रारब्ध. आणि अगदी समोर असूनही तो न स्वीकारता येणे म्हणजे कपाळ करंटे...मी ही या पैकी एक. दिवस रविचारचा होता, काही खासगी उद्योग आटोपून घरी आलो. आत्यंतिक वेगाने सौ स्वयंपाक करून तयार झाल्या आणि मी आपलं चालक म्हणुन तिला सोडण्यासाठी निघालो. तिला SP College च्या गेट वर सोडून परत यायचं होतं.  पण जसजसा मी त्या जवळ जात राहिलो तसतसे माझी उत्सुकता वाढत गेली. शुभ्र वस्त्र आणि काही केशरी (नारंगी,  Orange) परिधान करुन हजारो बंधु भगिनी तिकडे येत होत्या. हळूहळू तिथे हजारोच्या संख्येत लोक जमा होत होते. निमित्त होतं, गीताधर्म मंडळाच्या शताब्दी निमित्ताने एकत्र गीता पठण. त्यांचे प्रमुख श्री दातार यांचा तो संकल्प होता. किमान 10000 लोक एकत्र येऊन पठन करण्याचा.  ऑगस्टमध्ये जेंव्हा पंतप्रधान श्री मोदी पुण्यात होते, तेंव्हाच त्यांनी याची संकल्पना...

सुकून, शांती और खुद का एहसास !!

Image
 सुकून, शांती और खुद का एहसास !! वैसे तो हर दिन ही करते हम ध्यान (meditation) और सजते है लेकर ढेर सारा ज्ञान पर एक बार धुंढ के देखो अपने आप सुकून शांती से भरी मूर्ती का ओ रूप वर्जीश (exercise) करके प्रफुल्लित तन और चैतन्यभरे ऊस शरीर को लेकर मानो कश्मीर की खूबसुरत वादिया हो फुल, पौधे, पंछी सब 'डोल रहे है साथ इस जहाँ की हर ओ खूबसुरत चीज  बस कुछ पल मे देख सकते हो आप प्यारा सा समंदर उसकी सुंदर लहरे  जो चाहो उसको पा सकते है आप  एक बार अपने आप को समर्पित कर ध्यान करो, मस्त रहो, स्वस्थ रहो  एक सचेतन दिन की शुरुवात करो और  अद्भुत अनुभूती का आनंद लो ... शरद पुराणिक After meditation 301123.

फिर वही दिल लाया हूं....एक अविस्मरणीय विवाह सोहळा

 फिर वही दिल लाया हूं....एक अविस्मरणीय विवाह सोहळा काल पुन्हा एकदा एक दिव्य, अद्भूत विवाह सोहळा अनुभवला.  तसं तर हल्ली सर्वच सोहळे दिमाखात साजरे होतात, पण कालच्या या सोहळ्याचं विशेष कौतुक. कारण तो हृदयाच्या कुपीत घर असलेल्या एका मित्राच्या मुलाचा.  मी आणि सुनील देशपांडे यांनी 1989 साली सोबतच नोकरी सुरु केली. तो चारठाणा (परभणी) तर मी बीड हुन औरंगाबाद ला पोटापाण्यासाठी आलो होतो. तो तसा शिक्षणासाठी इथे होताच, तिघे भाऊ एकत्र राहून शिक्षण घेत होते. अशातच आमची लुपिन मध्ये ओळख झाली अन या मैत्रीची बीजं तेंव्हाच रोवली गेली. आमचा तो प्रवास मी काम धंदा, पोटपाणी आणि बरंच काही या लेखातून विस्तृतपणे मांडला होता... पण त्याचा धागा धरून ती माळ तशीच ओवतो.  साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील आम्ही अगदी सामान्य जीवन जगत होतो, पण मैत्रीचा धागा तलम रेशमी श्रीमंत होता. या धाग्यात एकत्र विणलेले सुहास जोशी, विश्वास जोशी, संजय पिंपळकर, मदन देशमुख असे बहुरंगी धागे त्यामुळे ती वीण अगदी घट्ट, डेरेदार, मजबुत आणि सुंदर होती आहे.  आमचं सर्वांचे नातं तर विचारूच नका. म्हणजे  मुलगी पाहणे, बोलणी, ...