भाग 2 - आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !!
भाग 2 - आजी म्या किरवंत जाहलो...आधारवड हरवले ...हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है !! खरं तर हे असे भाग लिहायची वेळ येउच नये, पण दुःखाचे हे दगड धोंडे असे येऊन आदळतात अन त्या जखमा खोल खोल होतात, आपण भेटुन सावरतो ही पन ते व्रण अनेकांची आयुष्य विद्रूप करतात. परवा एक घनिष्ठ मित्र असाच डाव अर्ध्यावर सोडुन निघून गेला. आयुष्याच्या सारीपाटावर एक सुंदर खेळ सजत असतानाच, त्या सोंगट्या तश्याच टाकून गेला.... संघर्षाची एक खेळी संपत येऊन सुख असं उंबरठ्यावर असतानाच हा निघून गेला. समोर दोन गोंडस मुलं, प्रेमळ बायको डावावर तसेच त्या सोंगट्या पसरलेल्या सारीपाटावर सुन्न .. काय सांत्वन करायचं, कोणी कोणाचं हे अनुत्तरित प्रश्न आ वासून त्या भयानक वातावरणात घोंघावत होते. एक एक दिवस असले काही अनुभव सोबत घेऊन येतात ज्याला शब्दांत बसवणं आणि नेमक्या त्याच भावना पोचवणे ही कठीण ....पण व्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही ही अशी त्रेधातिरपीट होते. रोजच गंमत करत जगलं पाहिजे असं नाही, या गमतीलाही एक दुःखाची झालर बसते कधी, ती असतेच पण जाणवत नाही जोवर ती चमकदार रजई अंगावरून निसटत उघडे पाडते...चमक दूर होते अन लक्तर...