अचाट, अद्भुत, अफाट, अवर्णनीय, अफलातुन, अशक्य ते शक्य .. श्रावणमास शिवपूजन भाग सातवा - माजी विद्यार्थी सेना आणि त्यांचा गुरुभक्तीचा सेतू.





अचाट, अद्भुत, अफाट, अवर्णनीय, अफलातुन, अशक्य ते शक्य  ..  श्रावणमास शिवपूजन भाग सातवा - माजी विद्यार्थी सेना आणि त्यांचा गुरुभक्तीचा सेतू.  


काल  भक्तिभावाचा अतिउच्च शिखर पाहिला

भावनांनी मात्र हा शिखर ही अक्षरशः वितळला 

एकीकडे दिव्यत्वाची तेज उजळुन निघाली अन

भाव विभोर मन  गदगदली अन डोळे पाणावले


परवा दुपारी कार्यालयात एक टेम्पो भरून फुलं आली ज्यात 500 किलो फुलं होती, ती अशी एका कोपऱ्यात रचल्या गेली अन पाहता पाहता तो परिसर फुलांनी गजबजला.  काही तरी मोठं घडणार यात वाद नव्हता. दिवस आता उत्तरार्धात निघाला होता पण इकडे उत्साहाच्या परिसीमा भेदून अक्षरश: ते संचारने या अवस्थेकडे निघाले. दिवस संपून रात्र झाली तरी ही अचाट शक्ती अशी काही जोमात होती की विचारू नका. येणार जाणार प्रत्येक जण काही थोडीफार मदत करत होते तर आमच्यासारखे फ़क्त काय सुरू आहे हे पाहण्यात व्यस्त.  आता मध्यरात्र उलटली, एखादा कुलाचार असावा आणि त्या देवीसाठी आपण जागरण करावं असच काहि तरी....काही भगिनी बंधु टाळ घेऊन स्तोत्रं, गित, नामस्मरण करत रात्र जागुन काढली.. पण अजून ही फुलांच्या माळा, पाकळ्या करायचे काम पूर्ण नव्हतं झालं. 


विशेष म्हणजे श्रावणमास म्हणजे या लोकांच्या व्यावसायिक उत्पन्नाचा एकमेव महिना, जिथे पुढची चार दोन महिने व्यवस्थित जातात. अस असताना ही दोन तीन दिवस सर्व विसरुन या कार्यात त्यांनी झोकुन दिलं याचं मला विशेष कौतुक वाटलं. कामांत चर्चा होत असताना विद्यार्थी आपसात बोलत होते ...आमचा देव साक्षात इथे असताना बाकी सर्व नगण्य आहे...उद्या पूजेत प्रत्यक्ष शिवशंभो समोर उभे राहिले अन दर्शन घ्याव असं म्हणलं तर आम्ही अगोदर महाराजांचं दर्शन घेऊन नंतर शिवशंभो चं घेऊ ....काय ती अगाध गुरुभक्ती, सश्रद्ध भाव आणि समर्पन  भावना. या वर ते म्हणतात ही समर्पण भावना आम्हाला गुरूकडूनच घेतली आहे.


कालची सकाळ एवढे दिव्य घेऊन येईल याची पुसटशी कल्पना होती पण तो एवढा भव्यदिव्य असेल याची सूत मात्र शक्यता नव्हती. भल्या पहाटे काहि योध्दे केळीच्या बागेत होते आणि तिकडणं शेकडो केळीचे खांब घेऊन आले. दिवसभर केलेले हार, माळा लावण्याचे काम एकीकडे सुरू, तर दुसरीकडे सभागृहात केळीचे खांब आणि एक छान पुष्प पायघड्या चा मार्ग निर्माण केला ज्यावर पांढरी, पिवळी, केशरी आणि गुलाब अशी विविधरंगी पाकळ्यांनी तो  मार्ग भरवून टाकला. मुख्य पूजेच्या स्थानालाही अगदी भव्य पूजेचा चौरंग सजवावा असं छान नियोजन. ही मंडळी गेली 24 तास पूर्णतः जागं राहुन एवढ्या उत्साहात ते सर्व करत होती की विचारूच नका. आता तो उत्साह शिगेला पोचला होता,  एक जागा जरा मोकळी होती तिथे या चानाक्ष मंडळींनी लगेच यज्ञशाला आणि त्याचे प्रतीक म्हणून 5 कुंड आकारली.


जणू काही कुठला राज्याभिषेक सोहळा आहे की काय इतकं ते धार्मिकतेणे नटलेले सभागृह आता मंगलमय होत होत जात होतं. इतक्यात श्री महाराज आणि सौ मायबाई यांचं आगमन झाले अन त्यांचे औक्षवण झाले त्याला आमच्या या सर्व विद्यार्थ्यांनि एकासुरात दिलेला मंत्रांचा आवाज ...एकीकडे  भक्ती, प्रेम, धर्म, समर्पण भाव.. समोर साक्षात शिवपार्वती स्वरूप,  मंत्रोच्चार , यज्ञ नारायणाचा जयघोष आणि तो परिसर दुमदुमला... बहुतेक ती भावपूजा व्यासपीठावरील केदारनाथ च्या प्रतिकृतीतून शीवजी नि मानुन घेतली असेल. 

त्या राजयोग मार्गावरून शिवपार्वती तेथे विराजमान झाले अन त्या अलौकिक सोहळ्यास सुरुवात झाली...अभिषेक संपन्न होत होता.. 


इतक्यात कार्यक्रम स्थळी आदरणीय आचार्य श्री गोविंद गिरी (वेद व्यास असं आमच्या महाराजांनी त्यांना दिलेलं नाव)..त्यांची विधीवत पाद्यपूजन, औक्षवण आणि त्याच मार्गाने त्यांनाही सुशोभित विशेष स्थानावर नेण्यात आले,तेंव्हा आरती सुरू होती आणि शेकडो आरत्यांच्या तेजात त्यांचं आगमन झालं.  ते वातावरण पाहून आणि एकंदरीतच त्या सभागृहात जे काही होतं ते पाहुन आचार्य जी ही स्तब्ध होते.. त्याविषयी त्यांनी बोलून ही दाखवलं की मला अशाच ठिकाणी यायला आवडतं. हजारो गुलाबांनी तयार केलेला एक मोठा हार त्यांच्या आणि माऊलींच्या गळ्यात घातला, त्यांनी तो काढुन पुन्हा महाराज आणि मायबाई यांना तो घातला आणि विध्यार्थ्यांना आणि उपस्थित सर्वांना कृतकृतार्थ वाटले. त्यांच्या पवित्र वाणीतून त्यांनी गुरू कार्याचा आलेख वाचला आणि दोन वेळा ते भावुक झाले. मोठया महाराजांचा उल्लेख करताना ते म्हणाले "ते व्यक्ती किंवा मनुष्य म्हणून या जन्मी आलेच नाहीत तर एक शिवतत्त्व म्हणून या भूतलावर अवतरले आणि त्यांचं इथलं कार्य मार्गी लावून ते पुन्हा त्याच तत्वात विलीन झाले" .....बहुत काय सांगणे ... मी या पुढे लिहुच शकत नाही. 

 

महाराज एक विनंती पुढच्या जन्मी तुमचा विध्यार्थी म्हणून आयुष्यभर तुमच्या सेवेत राहायचे आहे !! त्या अद्भूत शक्तीचा मला ही भाग व्हायचय हो !! 


शरद पुराणिक

दिव्यभूमी

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती