Posts

Showing posts from 2022

Swami Saranam Ayyappa - Chinappa and Bala swamy augmenting the spiritual culture to next gen

Image
   Swami Saranam Ayyappa -  Chinappa and Bala swamy augmenting the spiritual culture to next gen.  The whole reason me pushing self very hard to write this in my broken English as the ones that are being portrayed, felicitated by words and winning my heart are not at ease with my Marathi writing. More so, they may not get the real essence of my feelings that I would like to convey. So excuse me for blunders that I would make in my write up. Just to take you back to the reference - why am I so excited to write about this ? In  early 2017 was transferred to Hyderabad. Just the winter was about to give the pleasant weather feel in the hot Hyderabad, I saw guys with black shirts, dhotis or black trousers with grown beards, big chandan tilakam on the foreheads….the number of guys I came across was so much… not that I earlier was unaware of this, as used to see these guys visiting some temples in Maharashtra. But seeing the multitude having commonalities made me more ...

इथे ओशाळला निषेध

 इथे ओशाळला निषेध शब्दांनाही किळस वाटावी इतके निर्लज्ज झालोय आम्ही तिसरीच्या इतिहासाच पान इतक्या तुकड्यात दुभंगलय त्या फोटोतल्या प्रत्येकांना गावच्या कोपऱ्यात बसवलय अवडतीचे न नावडतीचे सारे वसले आहेत डसण्यासाठी साला तो प्लेग बरा होता हो एवढा हा द्वेषाजार दुर्धर आहे ते झटक्यात मरण बरं होतं हे रोज तडफडणं नको झालंय कोरोनाही जायला नको होता माणुसकी चा जीर्णोद्धार होत होता उध्वस्त वास्तू नव्यानं उभारतात तसं जे गेले अनंत त्या वेदना आहेतच शब्द भावना व्यक्त अन अव्यक्त स्वार्थी दुष्ट अज्ञान असा दर्प दुर्गंध राग लोभ द्वेष मत्सर यांचा हैदोस इतकं टोकाचं ? शब्द ओशाळलेत सामान्य, राजकारणी, पत्रकार मी तुम्ही ते आणि हे सारेच  पछाडलेले या दुर्धर आजाराने या महामारीला औषध काय ?? असा खिन्न झालो की आठवतात शाळेत  दिलेली जयंती ची भाषणं जणू प्रत्येक जण अंगात संचारल्यागत ते इतिहासाचं पान शोधतोय मी ...  शरद पुराणिक रायचूर, कर्नाटक 201122

तू मात्र चालत रहा जोडलेले तोडत

 उठ सुठ "आठ"आहे पंजाच्या पोटात गाठ आहे वाजले पुरते बारा तरीही घड्याळात ही आठ आहेत चोरावर मोर या दुफळी मध्ये घड्याळ घातलेल्या हातात मशाल आहे तू चालत रहा रे तुझं तुझं घरी बसून झाली वर्ष आठ आहेत नाव गांधी चं घेत घेत यात्रेत स्वातंत्र्य विरावरच ती थांबते आहे तुम्हीच तोडता सारं  द्वेष पसरवत तू मात्र चालत रहा जोडलेले तोडत काही सोंग ही आहेत याच थव्यात हान महाद्या गुळवणी शेवटचा हप्ता बाकी घोडा मैदान समोरच आहे !!  शरद पुराणिक 171122

My travelogue - Train journeys learnings

 My travelogue -  Train journeys learnings  I have been writing my travelogue since 2017 and even before that. But since 2017 my fate is making me travel, away from family for my professional journey. I moved (of course alone) to Hyderabad in 2017 wherein used to travel weekly Pune-Hyderabad-Pune.  I enjoyed doing it in various modes car, bus, train, flight all of it. Traveling frequently you need to create some excitement else its boring. Slowly we have had a weekend travelling group formed and it surely brought in loads of fun. Sharing food, fruit, sweets, chats, share market, politics, corporate lives and what not. It was a great mix of IT, Pharma, Finance, Creative designers, Govt. Sector guys and getting along with them was a fun altogether.   I kept continuing it till July 2021. Ofcourse lockdown and  Pandemic was a break in this schedule.  I tried getting books with me to read but our co passengers (not the one in group) made it sure that I...

गप गुमान खाली बघुन हादड ना - उगाच का टीवल्या बावल्या

गप गुमान खाली बघुन हादड ना - उगाच का टीवल्या बावल्या आजचा विषय माझ्या खवय्येगिरी शी संबंधित आहे.  हो मी खादाड आहेच पण फार जास्त हॉटेलींग आम्ही करत नाही...त्या मागे अनंत कारणं आहेत, ते पुढे येईलच. मुळातच आमची जडणघडण अशा वातावरणात झाली आहे जिथे बाहेरचं सोडा पण घरी खाण्यासाठी ही नियमावली होती. काळ बदलला आम्ही पोटापाण्यासाठी मोठ्या शहरात आलो आणि हॉटेल आणि आमचा घरोबा वाढला. नंतर विवाह झाला, मुलं झाली, थोडा विरंगुळा म्हणून कधी तरी बाहेर पडायचं. आधी मंडळी घरीच करू असा आग्रह आज ही धरतात  पण मग त्यात वेळ जातो आणि गप्पा, मुलांसोबत वेळ घालणे राहुन जातात ...हो नाही करत बाहेर पडायचे ...आणि कुठेतरी बस्तान बसवायचे.   गंमत सुरू होते ती पार्किंग पासून, जिथे जागा असते तिथे तो सुरक्षा रक्षक गाडी लावू देत नाही. त्याच्या शिट्टीच्या तालावर तो नाचवुन त्याला जिथे वाटल तिथे लावायची.   हल्ली मला शंका येते की भंडारा, लंघर ला गर्दी नसते एवढी प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेल बाहेर. नंबर लाऊन आवतनाची वाट पाहणे हा एकमेव पर्याय असतो. या दरम्यान ही बरेच मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. आता आम्ही ...

शब्द भाव सौदर्याने नटलेली एक आगळी कोजागरी

 शब्द भाव सौदर्याने नटलेली एक आगळी कोजागरी आमचा चेहेरेपुस्तिकेवर एक समूह आहे "कोब्रा vs देब्रा"  फ़क्त टोमणेगिरी....प्रत्येक सण वार या वर ऊत्तम व्यक्त होण्याचे हे व्यासपीठ आहे. श्री मंदार संत यांनी ते मला उपलब्ध करुन दिले त्यासाठी त्यांचे आणि समूह सदस्यांचे अनंत आभार.  कोकणस्थ आणि देशस्थ असे सर्व एकमेकांवर टोमणे मारत इथे निखळ, निकोप संवाद लहरी उमटत राहतात आणि अत्यंत खेळीमेळीने ते स्वीकारून आनंद घेतात... अगदी गौरी, गणपती, नवरात्र, श्रावणी, गुढी पाडवा, दिवाळी, श्रावणमास, दीप अमावस्या इत्यादी इत्यादी असे सर्व सण आम्ही चित्र, संवाद माध्यमातून इथे साजरे करतो... काल मंदार जी नी एक सूचना केली की कोजागरी  चारोळ्या करत समुह मध्यरात्री पर्यंत सुरू ठेऊन साजरी करायची.... त्या सर्व चारोळ्या एकत्र मी इथे पाठवत आहे ... Mandar Sant : कोब्रा देब्रा जमले सारे शीतल या चांदण्यात  शुभेच्छा देता हरवले भान सर्वांचे आनंदात.. Sharad Puranik : कोजागिरीच्या छटा निराळ्या  कुठे दुधात केसर चारोळ्या  कुठे शब्दांच्या भाव चारोळ्या  चव भाव तेच गच्च्या  वेगळ्या तोच चंद्र तीच को...

TTMM ...तू तुझं, मी माझं - नवरात्र अन सीमोल्लंघन...

Image
 TTMM ...तू तुझं, मी माझं - नवरात्र अन सीमोल्लंघन... परवाच्या आंग्ल भाषेतील लेखात मी नवरात्र, पुर्व तयारी आणि खाजगी गोष्टी सांगायच्या की नाही या वर बराच उहापोह केला अन त्यावर मित्र, मार्गदर्शक, पाठीराखे, सखे, मित्र असे काही कडाडून भडकले की विचारूच नका.  आणि मला पुन्हा पुन्हा सर्व काही सांगून लिहिलं नाही तर धमकीवजा, काही प्रेमळ सल्ले तर काही अगदीच वास्तविक व्यावहारिक सल्ले मिळाले..आणि त्यांच्या त्या धमक्यांना घाबरुन का होईना मी लिहायला घेतलय बरं का, आर नाही तर पार !!  मग चार आठ दिवस शांत बसलेलं ते सारं वळवळ करतच होतं ...मग हाय काय अन नाय काय.  त्याचं झाल असं की मी 19 तारखेला व्यावसायिक स्थळी पोचलो... नेहेमी वेळेत येणारी रेल्वे नेमकी उशिरा पोचली ...सोबत बायकोने असं काही ओझं दिलं होतं की विचारु नका. जणू मी आता कुठे जंगलात किंवा त्या नवनाथ मालिकेतील पात्र जसे फिरताना  कुठेही वास्तव्य करतात... तीन भल्या मोठया पिशव्या... एकात धुवायला नेलेले कपडे, दुसऱ्यात एक शेगडी, रेग्युलेटर,  काही कढई वजा भांडी, चमचे तवा ..तर एक सर्वात जड थैली ज्यात ...भाजलेले मसाला शेंगदाणे, द...

To be OR not to be ….. to believe OR not… is the Question ? – The Curse !!

Image
 To be OR not to be ….. to believe OR not… is the Question ? – The Curse !! Today I am bringing a topic that would certainly create a discussion – some favoring it and some against it.  I have been famous of de-famous in revealing all the moments that I enjoy, live and by sharing them with people, try to double the joy.  Its said Sharing is Caring – there are thousands of quotes that would prove this.  Great satisfaction comes from sharing with others.  I always believed this and kept on moving ahead on path of writing.  On the contrary, I was always countered and had to undergo tremendous oppose to the sharing – they are all my close knit well wishes and TRUE care takers of me.  The thought that they always express is it necessary to share!! (?) I have been always overruling all those thoughts and neglected and made fun of it.   Slowly I have also developed the similar thought within and started thinking internally – am I doing it right by s...

India is changing…. MERA DESH BADAL RAHA hai... already changed a lot !!

  India is changing…. MERA DESH BADAL RAHA hai...   already changed a lot !!   Before I go forward, I request my dear readers to please take this in a positive spirit and am sure that someone OR so many will tell me alternatives to the issues I am discussing.   However, I am fully aware of them, but would like to put the facts … is the sole purpose of this write up.   As you all know I am currently based in Karnataka and staying in a place called Saidapur near Raichur.   This is my home away from home for last 6 months.   Last week travelled from Pune with a big baggage as Navratri is approaching and we all follow fasting (change of food you can say), then also perform some religious rituals to pray Goddess Nav Durga in all her forms on the the 10 days.   I have written a big write up on how the Navratri festival is celebrated in my family, if anyone is willing to read, can forward the same OR you can refer it on my blog http://shapu2021.b...

I lost my larger Oxygen cylinder….. Miss you Raju Srivastav !!

Image
 I lost my larger Oxygen cylinder….. Miss you Raju Srivastav !! While you survive, live a happy healthy life there are multiple factors around which support you directly indirectly.  We all have born, grown and brought up in a small places and have witnessed the rural life around us.  We never exposed to the advanced culture those days.  Initially, Radio was the only way of entertainment at home, but we have had loads of restrictions on it even.  Only a senior generation was allowed to listen “Binaca” geetmaala on Wednesdays and other late evening musical programs. It was exclusively meant for the Akashwani news at various time points in the day.  Days have passed and TVs have come in (initially black and white boxes – Onida and Optronix and so on).  Then it was an era of colour TVs and from Surabhi and other popular shows have been replaced with multi cultured serials of various regional languages and the era changed.  We belong to a region where...

एक अनोखे आणि कुतूहलात्मक गौरी पुजन

Image
 एक अनोखे आणि कुतूहलात्मक गौरी पुजन खरं तर हल्ली या सोशल मीडियावर गौरी या विषयी इतकं काही लिहून झालंय की विचारूच नका. श्रध्दा, नाती गोती, कौटुंबिक सोहळे, या निमित्ताने आमच्या भगिनींची होणारी धावपळ, देखावे, गौरींची विविध रूपे, दर कोस दर मजल तिच्या साजरे करण्याच्या पद्धती. माझ्या हाती आलेले सर्व लेख मी आवर्जून वाचतो अन या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या अनेक गंमती जमती, प्रसंग आणि सश्रद्ध भावनेतून केल्या गेलेल्या सणाची महती आणि त्याचं प्रासादिक फळ हे सर्व अनुभवायला मिळतं.  काही लेख वाचताना तर मला असं ही वाटून गेलंय की ही जणु काही आपलीच कहाणी आहे की काय.   पण आज मी एका आगळ्या वेगळ्या गौरीपूजनाविषयी लिहिणार आहे.  आमचे एक स्नेही, मित्र आणि सर्वांचे लाडके श्री मुकुंद गोस्वामी आणि सौ. नभा मुकुंद गोस्वामी यांच्या घरच्या गौरीपूजनाविषयी.  गेल्या वर्षी एक सुंदर गौरी चा फोटो मी मुकुंद च्या स्टेटस ला पाहिला अन आश्चर्यकारक रित्या त्याला विचारले अरे हा फोटो कसला, तर तो अगदी सहज म्हणाला ही आमची लक्ष्मी / गौरी आणि हे आमचे पुजन. त्या फोटोविषयी थोडेसे - आकर्षक लाल रंगाच्या साडीत ...

श्री यज्ञेशो विजयते - भाग आठवा - श्रावणमास शिवपूजन सोहळा - क्षण निरोपाचा

 श्री यज्ञेशो विजयते - भाग आठवा - श्रावणमास शिवपूजन सोहळा - क्षण निरोपाचा निरोप द्यावा की घ्यावा  निरोप का द्यावा कसा द्यावा  हे ही राहतात प्रश्नच कायम निरोप देताना आणि घेताना खरं तर सहवासात अनुभवलेले शब्द संवाद प्रेम अनुभव सारे  हेच तर असतात भेट वस्तू निरोपा साठी देवाण घेवान ते क्षण मात्र असतात भावनिक आवंढा गिळत आसवं लपवत निरोप रडवत राहतो आतल्या आत सतत महिनाभर सुरू असलेला तो शिव सोहळा काल संपुष्टात आला. संमिश्र भावना आहेत, ते या साठी की तो सोहळा इतक्या थाटामाटात पार पडला त्याचा आनंद एकीकडे तर उद्या पासून हे असणार नाही ही सतत छळणारी भावना.  हे जणू एक लग्नच होतं जणु आमच्यासाठी ..आधी दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि शिवाने पुण्याला पसंती दिली ...आता सुरू झाल्या बैठका. कार्यालय शोध मोहीम, ती ही सतत 35 दिवस उपलब्धी असणारं कार्यालय शोधणे हे जिकरीचे होते.  समूहातील चार सहा सदस्य आज इथे तर उद्या तिथे, video टाक, फोटो टाक असं करत करत " महेश सांस्कृतिक भवन" एकदाचे पक्के झाले .. गुरू माऊली आली, त्यांनी पाहिलं आणि ठरलं... त्यांच्या दिव्य दृष्टीतून त्यांना काय दिसलं माहीत...

अचाट, अद्भुत, अफाट, अवर्णनीय, अफलातुन, अशक्य ते शक्य .. श्रावणमास शिवपूजन भाग सातवा - माजी विद्यार्थी सेना आणि त्यांचा गुरुभक्तीचा सेतू.

Image
अचाट, अद्भुत, अफाट, अवर्णनीय, अफलातुन, अशक्य ते शक्य  ..  श्रावणमास शिवपूजन भाग सातवा - माजी विद्यार्थी सेना आणि त्यांचा गुरुभक्तीचा सेतू.   काल  भक्तिभावाचा अतिउच्च शिखर पाहिला भावनांनी मात्र हा शिखर ही अक्षरशः वितळला  एकीकडे दिव्यत्वाची तेज उजळुन निघाली अन भाव विभोर मन  गदगदली अन डोळे पाणावले परवा दुपारी कार्यालयात एक टेम्पो भरून फुलं आली ज्यात 500 किलो फुलं होती, ती अशी एका कोपऱ्यात रचल्या गेली अन पाहता पाहता तो परिसर फुलांनी गजबजला.  काही तरी मोठं घडणार यात वाद नव्हता. दिवस आता उत्तरार्धात निघाला होता पण इकडे उत्साहाच्या परिसीमा भेदून अक्षरश: ते संचारने या अवस्थेकडे निघाले. दिवस संपून रात्र झाली तरी ही अचाट शक्ती अशी काही जोमात होती की विचारू नका. येणार जाणार प्रत्येक जण काही थोडीफार मदत करत होते तर आमच्यासारखे फ़क्त काय सुरू आहे हे पाहण्यात व्यस्त.  आता मध्यरात्र उलटली, एखादा कुलाचार असावा आणि त्या देवीसाठी आपण जागरण करावं असच काहि तरी....काही भगिनी बंधु टाळ घेऊन स्तोत्रं, गित, नामस्मरण करत रात्र जागुन काढली.. पण अजून ही फुलांच्या माळा, प...

श्री यज्ञेशो विजयते !! भाग सहावा - श्रावणमास शिवपूजन पुणे - पूजेला पुष्पस्वरूप देणारी एक यज्ञसेविका अंजुताई अन आमचे यज्ञसेवक.

Image
 श्री यज्ञेशो विजयते !! भाग सहावा - श्रावणमास शिवपूजन पुणे - पूजेला पुष्पस्वरूप देणारी एक यज्ञसेविका अंजुताई अन आमचे यज्ञसेवक.  मागील सर्व भागात आपण पूजन त्याची माहिती, स्वरूप आणि त्याच्या अनुभूती या वर भरपुर लिहिले आहे. पण आपण जी पुजा काही चित्रात आणि ऑनलाईन पाहता... त्यात जी पुष्पसजावट पाहता ते कोण आणि कसं करतंय या विषयी आज आपल्याला सांगण्याचा हा एक प्रयत्न.  आता अगदीच चार  दिवस आहेत  ..हे लिहितानाही मन हेलकावे खातंय...पुढे काय ?? गेली 25 दिवसापेक्षा सुरू असलेला हा शिवदर्शन सोहळा आता उत्तरार्धात पोचतोय ही भावना मनात कल्लोळ करून सैरभैर होत आहे ...असो जेवढे दिवस आहेत तो प्रत्येक क्षण कुपित बंद करून ठेवायचाय. खरं तर कोणा एक दोघांचं नाव घेउन भागणार नाही कारण हा दिव्य सोहळा लोक सहभाग, गुरुकृपा आणि त्यांचा संकल्पपूर्ती साठीचा अखंड आशीर्वाद, तन मन धन अशी अभूतपूर्व मदत ज्या धर्म प्रेमी सज्जनांनी केली त्या प्रत्येक प्रत्येक प्रत्येक व्यक्ती, भक्ती, शक्ती रुपाला आणि गुरू माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन समेवर येतो.  रोज होणाऱ्या पुष्पसेवेत अखंड योगदानाबद्दल श्री उमेश श...

भाग पाचवा - श्री यज्ञेशो विजयते - श्रावणमास शिवपूजन पुणे - सर्वार्थाने शिवमानस पुजा अन स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव

Image
 भाग पाचवा - श्री यज्ञेशो विजयते -  श्रावणमास शिवपूजन पुणे - सर्वार्थाने शिवमानस पुजा अन स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं। नाना रत्न विभूषितम्‌ मृग मदामोदांकितम्‌ चंदनम॥ जाती चम्पक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा। दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितम्‌ गृह्यताम्‌ !! हे प्रभो, रत्ननिर्मित सिंहासन, शीतल जल स्नान, दिव्य वस्त्र, तद्नंतर विविध रत्नविभूषित अलंकार, मृग कस्तुरी सम चंदन, जाई, जूही, चंपा, गुलाब, कमळ, आणि बिल्वपत्र रचित पुष्पांजली, धूप, दीप ....अन कोमल स्वरातील संथ लयीत तुला जो रुद्राभिषेक आम्ही करत आहोत ती आमची सहृदय पुजा तुम्ही ग्रहण करा ....ओम नमः शिवाय. एकीकडे समस्त भारतवर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आमच्या महेश सांस्कृतिक भवनात त्रै शताब्दी सोहळा असा एक विलक्षण दुर्मिळ योग जुळुन आला. तो असा की आदरणीय गुरू महाराज गवामायन सत्र सोमयाजी दीक्षित रंगनाथ सेलूकर महाराज यांची जन्मशताब्दी, गुरू घरच्या अग्निहोत्र व्रताला आणि शिवपूजन व्रताला ही शंभर वर्षे पूर्ण झाली. हा अमृतयोग आणि सोहळा दिन प्रतिदिन असा काही फुलत चालला आहे की ...