तू मात्र चालत रहा जोडलेले तोडत
उठ सुठ "आठ"आहे
पंजाच्या पोटात गाठ आहे
वाजले पुरते बारा तरीही
घड्याळात ही आठ आहेत
चोरावर मोर या दुफळी मध्ये
घड्याळ घातलेल्या हातात मशाल आहे
तू चालत रहा रे तुझं तुझं
घरी बसून झाली वर्ष आठ आहेत
नाव गांधी चं घेत घेत यात्रेत
स्वातंत्र्य विरावरच ती थांबते आहे
तुम्हीच तोडता सारं द्वेष पसरवत
तू मात्र चालत रहा जोडलेले तोडत
काही सोंग ही आहेत याच थव्यात
हान महाद्या गुळवणी शेवटचा हप्ता
बाकी घोडा मैदान समोरच आहे !!
शरद पुराणिक
171122
Comments