श्री यज्ञेशो विजयते - भाग आठवा - श्रावणमास शिवपूजन सोहळा - क्षण निरोपाचा
श्री यज्ञेशो विजयते - भाग आठवा - श्रावणमास शिवपूजन सोहळा - क्षण निरोपाचा निरोप द्यावा की घ्यावा निरोप का द्यावा कसा द्यावा हे ही राहतात प्रश्नच कायम निरोप देताना आणि घेताना खरं तर सहवासात अनुभवलेले शब्द संवाद प्रेम अनुभव सारे हेच तर असतात भेट वस्तू निरोपा साठी देवाण घेवान ते क्षण मात्र असतात भावनिक आवंढा गिळत आसवं लपवत निरोप रडवत राहतो आतल्या आत सतत महिनाभर सुरू असलेला तो शिव सोहळा काल संपुष्टात आला. संमिश्र भावना आहेत, ते या साठी की तो सोहळा इतक्या थाटामाटात पार पडला त्याचा आनंद एकीकडे तर उद्या पासून हे असणार नाही ही सतत छळणारी भावना. हे जणू एक लग्नच होतं जणु आमच्यासाठी ..आधी दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि शिवाने पुण्याला पसंती दिली ...आता सुरू झाल्या बैठका. कार्यालय शोध मोहीम, ती ही सतत 35 दिवस उपलब्धी असणारं कार्यालय शोधणे हे जिकरीचे होते. समूहातील चार सहा सदस्य आज इथे तर उद्या तिथे, video टाक, फोटो टाक असं करत करत " महेश सांस्कृतिक भवन" एकदाचे पक्के झाले .. गुरू माऊली आली, त्यांनी पाहिलं आणि ठरलं... त्यांच्या दिव्य दृष्टीतून त्यांना काय दिसलं माहीत...