वेग आहे ? हा तर उद्वेग की हो

वेग आहे ? हा तर उद्वेग की हो भूकंप, हादरे, धक्के अन काय काय टोले, टोमणे, वार, पलटवार ही झाले नणंद भावजयीचे अन जावाजावाचे नळावरचे भांडण खुर्चीवर येऊन थांबले बातम्यांचा मात्र आला उबग आहे जसा राजकीय घडामोडींना वेग आहे चौकट मोडून नैतिकता झुगारून होत वरचेवर स्फोट, आघात आहेत फटाके जुने अन आवाज मंद आहे मीडियाच्या काड्या ही थिजल्या आहेत इसणावर गरम करून लावत आहेत पण वातीला वात काही जुळत नाहीये खुर्चीला त्या किमती सलाम आहे काढा त्या तसविरी पुतळे अन झेंडे सारं या खुर्चीपुढे खुजे, तकलादू आहे राजकारणाचा खेळ जणु जादू आहे मैदानी खेळ सभागृहात भरत आहेत लपंडाव, खो खो, खजिना, चिरघोडी लाडीलप्पा, लिंगोरचा, सुरपारंब्या, सारे विस्मरणात गेलेले जीर्णोद्धार होऊन आले... हे ही नसे थोडके !! शरद पुराणिक 220622