अंगिरस द्विरात्र सोमयाग
!!यज्ञेशो विजयते !! यज्ञ नारायण भगवान की जय
द्विरात्र अंगिरस सोमयाग
सदरील लेख हा माझ्या गेल्या वर्षी श्रावण महिन्यात लिहिलेल्या लेखाचा दुसरा भाग म्हणायला हरकत नाही. ज्याची लिंक संदर्भ म्हणुन खाली देत आहे.
https://www.facebook.com/742431662/posts/10159707072816663/
या मध्ये मी आदरणीय गुरू महाराज अहिताग्नी, बहु सोमयाजी यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांच्या यज्ञीय कार्य आणि त्याची यादी ही सोबत जोडली होती. त्याच कार्याचा पुढचा टप्पा "द्विरात्र अंगिरस सोमयाग" च्या माध्यमातून मु.पो. खडकीघाट जिल्हा बीड येथे कालपासून सुरू झाला. खरंतर गेली दोन वर्षे या महामारीच्या काळात हे घडु शकलं नाही. गेल्यावर्षी याची तयारी ही पूर्ण झाली होती, पण सरकारी आदेश आणि सामाजिक जबाबदारी चे भान ठेऊन हा पुढे ढकलण्यात आला आणि आता तो 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे.
अतिशय दिमाखदार, जोश पुर्ण, भक्तिभाव आणि उत्साहाने ओतप्रेत अशा शोभायात्रेने हा दिव्य सोहळा काल सुरू झाला. बाल गोपाळ, तरुण, मध्यमवर्गीय, वृद्ध अशा सर्व वयोगटातील स्त्री पुरुष आणि सोबतच दिव्य संत महंत यांच्या सहभागाने सोहळ्याचा श्री गणेशा अक्षरशः त्या जयघोषात आणि आनंदात सर्वदुर दुमदुमला. सर्व ऐतिहासिक आणि धार्मिक व्यक्तिरेखा राष्ट्रसंत, राष्ट्रपुरुष या यात्रेत सहभागी होत्या. न भूतो न भविष्यती लोक सहभाग पाहुन मन "गुरु गुरू" झालं. छोटयाशा त्या गावात तो प्रचंड जनसमुदाय पाहून साक्षात यज्ञ नारायण ही खुश झाले असतील. सोबत कार्यक्रम पत्रिका जोडत आहे.
आदरणीय महाराज गेला एक आठवडा तिथे जातीने हजर राहून सर्व पूर्व तयारी करत होते. ते स्वतः यज्ञशाळा, आजूबाजूचा परिसर निर्मितीत व्यस्त होते. त्यांनी स्वतः ही श्रमदान केले. खरं तर शेकडो स्वयंसेवक असताना ही ते बसुन न राहता तो परीसर दिव्यत्वा कडे नेण्यासाठी कष्ट करत होते. शांत, संयमित सूचना आणि मार्गदर्शन करत ते उजाड माळरान एका दिव्य कार्यस्थळात त्यांनी अगदी दोन दिवसात निर्माण केले. या साठी खडकी ग्रामस्थ, गुरुबंधू आणि वेदशाळे चे विद्यार्थी आणि आयोजकांचे उत्तम व्यवस्थापन या शिवाय हे शक्य नव्हते. गुरूंचा तो संकल्प सिद्धीस नेण्यास साक्षात श्री गणेश्वर शास्त्री द्रविड, उत्तराखंड चे स्वामी बलदेवानंद यांची उपस्थिती होती.
यज्ञ का करायचे आणि मुख्य उद्देश काय ? आता अनेकांना हा प्रश्न असेल, तर हे सर्व याग फ़क्त आणि फ़क्त या सृष्टीच्या संवर्धनासाठी आणि लोककल्याणकारी उद्देशाने केले जातात. हा कुठल्याही प्रकारे कुठल्यातरी विशिष्ट धर्मासाठी, सामूहासाठी, किंवा कुठल्याही आर्थिक उत्पन्न कमवण्यासाठी नसुन ते फक्त आणि फ़क्त जनकल्याण आणि सृष्टी संवर्धन या साठीच केले जातात. त्या विषयी लिहीत गेलो तर ते खूप दीर्घ होईल. देश विदेशींच्या अनेक संस्थानी या वर संशोधन केले आहे. ज्या मध्ये काही विशिष्ट आजार असलेल्या व्यक्ती आणि हवेतील नमुने घेऊन त्यांना एका विशिष्ट कालावधीसाठी या यज्ञीय अनुष्ठानाच्या आणि यातील आहुत्यांचा सानिध्यात राहून त्यांच्या शरीरावर होणारा सकारात्मक बदल सिद्ध झाला आहे. इथे आवर्जून सांगतो हे काही बुवाबाजी, अंधश्रद्धा या धरतीवर बोलत नसून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सिद्ध झालेल्या प्रयोगांच्या आधारावर लिहीत आहे. हवेत झालेले बदल ही या संशोधन माध्यमातून सिद्ध झालेले आहेत. फ़क्त ते करण्यासाठी धार्मीक पद्धत, संस्कार आणि त्यांच्या कृतीसाठी दिलेले विशिष्ट मंत्रोच्चार हे माध्यम आहे. अशी ही दिव्य यज्ञ संस्था टिकली पाहिजे हा मुळ उद्देश घेउन आमचे गुरू महाराज या साठी त्यांचं सर्वस्व अर्पण करत मार्गस्थ आहेत.
या प्रक्रियेचा एक भाग म्हणुन खडकीघाट येथे द्विरात्र अंगिरस सोमयाग सुरू आहे. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी या दिव्य कार्याची अनुभूती घेण्यासाठी 18 फेब्रुवारी पर्यंत खडकीघाट येथे आवश्य भेट द्यावी. सोबत दिलेल्या पत्रिकेत इतर माहिती आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेतच.
प्राचीन वैदिक यज्ञच का? व हा यज्ञसमारंभ कशासाठी?*
(आदरणीय, वंदनीय पुजनीय महाराज दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलूकर यांचे विचार खाली दिलेले आहेत)
अग्निपूजेचे रहस्य:-
यज्ञाचे शिर, यज्ञ पुरुषाचे मस्तक असलेल्या देवपूजेचे यथार्थ स्वरूप समजण्यासाठी विविध प्रतीक उपासनांचा उल्लेख केला आहे.
प्रतीक उपासनांचा उद्देशच मुळी त्या प्रतीक उपासनांद्वारे त्या त्या देवतांप्रमाणे त्या देवतांचे भक्त दिव्यगुणसंपन्न, तेजस्वी पुरुषार्थी बनावे असा असतो.
अग्नी हा तेजाचे दिव्यत्वाचे प्रतीक असून सतत वर जाणारा म्हणजेच उपासकांना परमोत्कर्षाचे मार्गदर्शन करणारा असल्यामुळे जगन्माता वेद माऊलीने सर्व मानवांना ईश्वरीय श्रेष्ठत्व मिळावे म्हणून या अग्नीप्रमाणे तेजस्वी दिव्यगुणी व सामर्थ्यसंपन्न व्हावे यासाठी अग्नीचे प्रतीक म्हणजेच अग्निहोत्र यज्ञसंस्था जगाला दिली आहे.
आपण मुखात घातलेल्या अन्न ज्याप्रमाणे पोटात आणि त्याद्वारे सर्व शरीरात संचरण करते त्याप्रमाणे अग्नीत दिलेली आहुती सूर्यापर्यंत जाऊन पोहोचते, वातावरणाव्दारे सर्वत्र संचरण करते, म्हणून अग्नीस देवांचे मुख म्हटले आहे. तो स्वतः वर जातो आणि त्याच्यात आहुत होणाऱ्याला ही वर नेतो .म्हणजेच तो स्वतः प्रगत आहे आणि सोबत येणाऱ्यासही प्रगतीपथावर नेतो. आपण मोठे होणे आणि आपल्या सोबतच्यांना मोठे करणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आम्हाला अग्नी शिकवतो. यासाठी अग्निहोत्र व्रत दीक्षेव्दारा अग्नी प्रतीकाची उपासना करण्याची आज्ञा वेदमातेने आम्हाला दिली आहे.
पृथ्वीपासून निघालेल्या आणि आकाशाकडे झेपावणाऱ्या तेजाला "म्हणजे अग्नीला" वायू आणि आप हे दोन शत्रू आहेत. कारण वाऱ्याने आणि पाण्याने अग्नी विझतो.
पण अग्नी त्याला कसे तोंड देतो याचा वेदमातेने केलेल्या विचाराचे अवलोकन केल्यास आपणास यशस्वी जीवनाचे सूत्र मिळते.
ज्या वायूमुळे तो विझू शकतो, हळूहळू त्याच वायूच्या साहाय्याने तो स्वतःची शक्ती वाढली की, ज्याच्यामुळे तो विझू शकत होता तोच वायू त्याला अधिक भडकवून शक्तीशाली बनवतो.
आपल्याला संपवू शकणारी शकणाराशी थोडे संयमाने, विवेकाने वागून त्याच्यांच अस्तित्वाने आपली शक्ती वाढवावी आणि एकदा का आपली शक्ती वाढली की आपलेच विरोधक आपले समर्थक बनतात. हेच यशस्वी जीवनाचे सूत्र अग्नि आम्हास शिकवतो.
पाण्यातून जसे वायूदाबाच्या साहाय्याने पाण्यातूनच जलविद्युत म्हणजे अग्नी निर्माण केला जातो हाच यज्ञ!!!
त्याचप्रमाणे विरोधाला पचवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे कौशल्यासच अग्नी विद्या म्हणतात. हीच अग्निहोत्र यज्ञसंस्था. वायूदाबाच्याच साहाय्याने जल-विद्युत म्हणजे अग्नीच निर्माण केला जातो. हे जे विरोधाला पचवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे, हीच अग्नी विद्या आणि हे आत्मसात करणे हेच अग्निहोत्र! हीच अग्नी पूजा!!
ज्ञानभक्ती युक्त कर्मवीर व्हा
पराक्रमी पुरुषार्थी धर्मवीर व्हा
शरद पुराणिक
130222
Comments