स्वर विरले ...निघाले दूर प्रवासी
स्वर विरले ...निघाले दूर प्रवासी
वसंत पंचमी अजून उत्तरार्धात होती
काल सरस्वती वासत्यवास होती
आज तिच्या लेकीला घेऊन निघालीये
तो पहा गरूड ही तयार नाहीये
मैफिलीत सजलेला वीणा रुसलाय
शुभ्र वस्त्रातली सरस्वती हिरमुसली
दोघीही या दिव्य प्रवासासाठी सज्ज
भारत भु ओली चिंब आहे आसवांनी
तिकडे देवदूत सज्ज आहेत स्वागतासाठी
गरुड ही झेप घेतोय पण वाट मोकळी नाही
दिदींच्या स्वरांचे ढग इतके दाट आहेत
चौफेर स्वरांची न आसवांची बरसात आहे
एकच आर्त - देऊ तुला कसा निरोप
हा योगायोग नाही ..
हे असेल का विधात्याच नियोजन
शरद पुराणिक
060222
Comments