मुंगेरीलाल के हास्यास्पद सपने
मुंगेरीलाल के हास्यास्पद सपने
पन्नास वर्षे झाली हो ...पन्नास पन्नास
माझी आवडती संख्या ही ...पन्नास
संख्या मी कधी पार करत नाही ..
संपत्तीचा मोह मात्र सोडणार नाही
इतिहासात ही झालेच की राज्याभिषेक
बंद दाराआड द्वेष मत्सर न लोभात
ते तरी खरे राजघराणे होते स्वराज्यात
इथे हे दलबदलू सरडे एकजात सारे
स्वराज्यात ही झालेच कट आणि शह
लाखोंचा पोशिंदा देव ही यात अडकला
बेरजा बेबाक झाल्या की सारेच सरडे
मग कच्चे बच्चे कोणीही करा सामील
मोहात सत्तेच्या नीती मूल्य फेकली
लालची सर्व सत्ताच उलथायला निघाले
बोट धर, कुठे पाय धर तर कुठे काय
पण कधी तरी ढिल ही पडतेच
भंजाळलेले स्वघोषित राजे बेजार
पाऊस ऊन वारा नाते गोते बेकार
तो फिरतो या दारी त्या दारी शेजारी
कुठून कशीबशी एक अवदसा सापडते
तिने निदान स्वबळावर राज्य केलंय
तुमचं बळ सदैव व्यर्थ वाया गेलं
ती ही यांच्याच विचारांची निघाली
पुजा प्रथा सर्वानाच तिलांजली दिली
सत्ता अन मोहापायी किती कराल हो
ही लाचारी आता पाहवत नाही
सोयीप्रमाणे निघणाऱ्या टोप्या फेटे
अन त्या सोबतच त्यातले विचार
रायरंद बहुरूपी न पोतराज बरे
निदान हेतु तरी प्रामाणिक आहे
सतत कट कारवायांच्या रात्री तुमच्या
अन दिवा स्वप्न तुमची कधी जळतील
त्या उद्याची आहे वाट पाहणे
मुंगेरीलाल के हास्यास्पद सपने
Comments