काल मध्यरात्री मित्राचा संदेश आला, उद्या भेटायचं का एकत्र गप्पा गोष्टी आणि मुख्य म्हणजे "भेट" जी दुर्मिळ आहे ...त्याच दुर्मिळ भेटीसाठी आमचा मित्र सतत धडपडत असतो ...त्यासाठी खालील ओळी सुचल्या ....
####
मिल्या या तुझ्या तळमळीचे काय करू
तुला हो म्हणू की नाही म्हणू ?
प्रत्येक वेळी तुझी ही आर्त साद ऐकतो
खरं सांगतो मी तर तयार, आत्ता येतो
पण हीच तळमळ इतरांना का नाही
जरी व्यस्त तरी एक ओळ उत्तर नाही
या ऋणानुबंधाच हे गाठोडं मात्र घट्ट
अनेकदा पडता पडता राहतं का बरं?
मी जरी असलो तयार उतावीळ तरीही
इकडे दूरदेशी, माणुसघाण्या लोकांत
असलो नसलो फरक पडत नाही त्यांना
दुःख नाही कारण ती आपली नाहीत
नव्यानेच कळलेल्या संस्काराने कळलं
हा सण उत्सव सोहळा आपला नाही
पण पाडव्याला ही आपण भेटलो नाही
दिवाळी ही तशीच घरकोंबडी झाली
भेटण्यासाठीचा हा तुझा आटापिटा
मला पुर्ण समजतो, नसलो पीत तरी
तुझ्या भावनांचा ग्लास भर, मी भरतो
अन तुला इथूनच चांगभलं करतो .
Cheers.. Happy New Year..
शरद पुराणिक
311222
Comments