छत्रपतींना डावलुन अफझलखानाला मुजरा आहे
येईल का जाग रायगडाला बेधुंद काळ्या रात्री महाराज तुमच्या राज्यात आता नाही खात्री भगव्या रायगडाला हल्ली हलका एक डाग आहे छत्रपतींना डावलुन अफझलखानाला मुजरा आहे अठरापगड मावळ्यांनी दगड दगड वेचला छातीचा कोट करून उभारलं स्वराज्याला किल्ले न किल्ले जिंकायचं स्वप्न उराशी घेऊन घौडदौड राजे तुमची अन मावळ्यांची अहोरात्र हजारोंनी झेलले वार राजें साठी, ओवाळले प्राण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे हा एकच ध्यास त्याच रायगडावर आता उलटा प्रहार आहे दगडं, चुना रंगवून वेगळीच आरास सजत आहे का का? हो राजे जीवाचं रान केलंत आम्हांसाठी आमचं छप्पर शाबूत ठेवलेत ते या दिवसासाठी? सिंहासनाला पाहताच मुजरा होतो आपसुक पण इथे त्याच सिंहासनाची अवहेलना आहे यांच्या बरबटलेल्या विचारांनी डागाळलय सारं स्वार्थी गिधाडं घुबड टपून आहेत याच्या साठी म्हणूनच आता रायगडाला जाग आलीच पाहिजे दबलेल्या या धमण्यात ते रक्त उसळलच पाहिजे कारण छत्रपतींना डावलून खानाला मुजरा होतोय शरद पुराणिक 230222