Positive की Negative हा एकच सवाल आहे

 To be or not to be ...that is the question

(पुन्हा आदरणीय कुसुमाग्रज यांची माफी मागुन)



Positive की Negative हा एकच सवाल आहे

या omicron च्या दलदलीत लक्षणं असून ही

निर्लज्ज होऊन जगावं बेशरम, बेदरकार भावनेनं

आणि फोफवावा आजार याच संक्रमनाने

मला, त्याला अन साऱ्यांनाच 

आजाराच्या विळख्याने असा फास टाकावा

की प्रत्येकाला असावा positive चा शाप

पण मग, पण मग त्या 

Positive ला ही Negative चं स्वप्न पडलं तर...

इथेच मेख आहे... 

पुन्हा negative च्या विश्वात प्रवेश करायचा

आणि सर्वाना तो प्रसाद देत राहायचं

हिंमत होत नाही म्हणून आम्ही सहन करतो

हे विषारी प्रेम अगदी प्रेताच्या निर्जिव पणाने

शरीरावर होणारे अत्याचार सतत

अहंकाराच्या या लाटेत माणुसकीची विटंबना

आणि अखेर quarantine चा शिक्का घेऊन

कोंडून घेतो स्वतः ला आपल्याच घरात...


विधात्या तू इतका कठोर का झालास?

एकीकडे आम्ही ज्यांना जवळ केल ते विसरले, आणि

दुसऱ्या बाजूला ते ज्यांनी हा प्रसाद दिला ते ही विसरले

पण मग आजराची लक्षणं घेऊन

हा संक्रमित देह घेऊन हे करुणाकरा

आम्ही कोणत्या डॉक्टर कडे जायचं,

कुठल्या इस्पितळात पाय टाकायचे

आणि ते आम्हाला घेतील ????


शरद पुराणिक

200122

Comments

AMRUT MAHAJAN said…
मस्तच की!

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी