थांबवा रे त्या चुकीच्या सोंगट्या
शकुनी आणि मंथरा आहेत हो हयात
दुधास लिंबु नासवते तसे हे ही तहहयात
डोळे असून ही घरात दडलेले धृतराष्ट्र
अन् तसंच आंधळं पुत्रप्रेम ही आहेच
क्षणाक्षणाला घात करणारी मंथरा वृत्ती
सतत खेळ खंडोबा करणारे शकुनी आहेत
रावण कंस ही आहेत यत्र तत्र सर्वत्र
प्रत्येकाची अघोरी अनुष्ठाने सुरूच आहेत
फरक हा की, त्यांना असंख्य अनुयायी नव्हते
इथे शेकडो हजारो लाखो अंध आहेत
त्यांना तर स्वकियांकडून ही विरोध झाला
पण हे सर्व सत्ता लालसेचे गुलाम आहेत
रामायण, महाभारत उदाहरण आहेत
शेवटी विजय कोणाचा झाला सर्वश्रुत आहे
बुद्धीजीवी या सदृश लोकांना दृष्टी नाही
सत्याची कास धरणं यांना कधी जमलं नाही
अति तिथे माती, सर्व श्रेष्ठ देशभक्ती
या आणि अश्या असंख्य म्हणी वाचा
संतश्रेष्ठ ज्ञानोबा तुकाराम ही वाचा
स्वकल्याणा परि राष्ट्रकल्याण मंत्र वेचा
थांबवा रे त्या चुकीच्या सोंगट्या
नका मारू आयत्या पिठावर रेघोट्या
भाचे, पुतणे, सुना, पोरा, बाळांनो
काळाची पावलं नीट ओळखा बाबांनो
शरद पुराणिक
170122
Comments