Posts

Showing posts from October, 2023

जन्मदिन शुभकांक्षा आदरणीय मोदी जी

Image
 जन्मदिन शुभकांक्षा आदरणीय मोदी जी कुछ साल पाहिले देखा था आप को मोम से भरा एक पुतला था कोने मे कइ और हस्तिया भी थी वहा इर्दगीर्द हम ने चुन के तस्वीरे खिची आप की आज आपके नेतृत्व के प्रभाव से इर्दगीर्द का मोम पिघल ही गया जैसे बनी बनाई तसबिर पुतले ही नही कही चारो ओर बस आप, आप, आप हो भारत की प्रभावशाली परंपरा को लगन से आप सवर, सजा रहे हो खिल उठी उसकी खूबसुरती हर पल आज है देश स्वाभिमान की उंचाई पर  बाल बच्चे, नौजवा, बुढे, हर कोई हर शक्स की दिल मे जगह बनाई  प्यार ज्यादा और तो कही नफरत है घर परिवार गली राज्य मे  बसे हो आज हम सब देशवासीयो का गुरुर, अभिमान, गौरव, निष्ठा, श्रद्धा सन्मान, गर्व, चाहत, ईबादत और  भारत भु का रोशन सीतारा हो .... सजा दो गुलशन को रोशन  मोदीजी का जन्मदिन है आज... ढेर सारिया बधाईया नमो नमो जी !! शरद पुराणिक 170923

उठ कृष्णा .. आज तुला उठावं लागेल

 उठ कृष्णा .. आज तुला उठावं लागेल बस कर तुझ्या त्या खोड्या, दंगा, मस्ती घरातलं लोणी दही आज मिळणार नाही सुदामा ही आज खुप व्यस्त आहे चौकात त्यांना आवरण्यासाठी तुला उठावं लागेल शाळांमध्ये तू कालच गेला होतास म्हणे कुठे नृत्य केलेस, हंडी ही फोडलीस म्हणे माता भगिनी तुला सजवण्यात व्यस्त होत्या घाईघाईने तुला घेऊन पोचल्या ना तिथे आज मात्र तुझी दमछाक होणार आहे रे कुठे कुठे जाणार आहेस आणि कसं रे गावोगाव गल्लोगल्ली हंड्या सजल्यात रे तुझे गोविंदा सारे आज बेभान आहेत रे गोपिका आज कुठेही येणार नाहीत बरं का आखूड कपड्यात ललना तिथे नाचनार ना कर्णकर्कश आवाजात तूला ऐकु येईल ना गर्द दिव्यात कान्हा तू दर्शन देशील काय गोवर्धन पर्वत नाही तर नाही, चालतंय की इमारती अन वस्त्या डोक्यावर घेतील आज भले आवाजाने छाती फुटून जाऊ दे ना तुला आज गेलंच पाहिजे त्या व्यासपीठावर रस्ते तुंबतील, वाहनांच्या रांगा लागतील कामगार खोळंबतील माता अडकतील त्यांचा कान्हा त्यांची वाट पाहत असेल घरी पण तू थांबु नकोस, ते सर्व होत राहील लाखोंच्या हंड्या अन विविध कुरुक्षेत्रावर आज गितोपदेश मात्र करू नकोस रे बाबा अर्जुन नसतील कोणी  तुझं ...

आज सोहळा बहीण भावांच्या प्रेमाचा .....

 आज सोहळा बहीण भावांच्या प्रेमाचा ..... नात्यांच्या वेटोळ्यात एक घट्ट धागा सतत तुमच्यात गुंतलेला प्रत्येक टप्प्यात ती मात्र कायमच असते साथ, सोबत तुम्हाला सावरत स्वतःच विसरुन  असतात ना त्या गोड आठवणी भांडण्याच्या छोट्या कारणावरून पण ती रागावलेली ही सहन होत नाही तिची कट्टी फु त्रासदायक वाटते डब्यातले पदार्थ हिसकावून घेणारी तोच घास प्रेमाने भरवुन सुखावणारी तुम्ही शाळेत विसरलेल्या गोष्टी तिच्या बॅगेत आठवणीने घेऊन येणारी तुमच्या खोड्या अन प्रताप लपवणारी गमतीने सांगू का म्हणत, न सांगणारी आपल्यासमोर मोठी मोठी होत जाते अन एक दिवस ती सासरी निघते फुलांनी सजलेली गाडी निघुन जाते घरातली बाग हिरमसून सुकते  वृंदावणातली तुळस ही मान टाकते ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वसते कर्तव्य, धाक, आठवणी, आधार  या रूपातून सतत मात्र सोबत असते नसलेल्यांची आई तर  होतेच होते  असलेल्यांची ही छोटी आई असते सख्खी, चुलत, मावस, आत्ये बहीण वहिनी, मेहुनी, मित्राची बायको  कोणत्या ना कोणत्या ऋणानुबंधात आपल्याला घट्ट  विणत असते  प्रेमाचे चार शब्द, आपुलकी, सहवास एवढी  माफक तिची ओवाळ...

जावयाच्या वाणाच ताट हाती

Image
 आमचे मित्र गुणवंत सराफ यांनी एक सुलेखन चित्र काल पाठवले, त्यावर एका मराठी गाण्याचं विडंबन करून हे पाठवत आहे ....हे फक्त एक गंमत म्हणून वाचावे... भावना दुखावने हा हेतू नाही... किंवा संस्कृती चा अपमान अजिबात नाहीच.... (ज्वाणीच्या आगीची मशाल हाती ....दिसला गं बाई दिसला या गीताचा आधार घेउन) ओहो ~~ जावयाच्या वाणाच ताट हाती आला हा योग धोंड्याच्या मासी येतो तो दर तीन तीन वर्षांनी जावइ खुष कधी इकडं कधी तिकडं जाती एकुलते एक, अनेक जावई लाडके हो  काही मिळणा मला हो कुठं दिसंना मला कुठं मिळणा तिथं मिळना मागु कोणाला मागू कोणाला संपला  न राव   संपला मला न देताच संपला धोंडा संपला सासू सासऱ्यात खूप खूप गोडवा त्याच्या वानात धोंडा, करंजी, अनारसा  हो कडक धोंडा अन ठिसूळ अनारसा  तोंडामध्ये विरला न राव साहेब तोंडामध्ये विरला डब्ब्यामध्ये, ताटामध्ये, ओट्यावर  संपला  ना राव संपला, संपला ना राव संपला कुणाला न देता तर कुणाला अति देता संपला धोंडा संपला ना राव संपला या जावयाचा न्यारा च डौल कधी खुष कधी वेगळाच कौल लहरी पटका मानेला झटका ओ आला घरी रुसला  ना  राव स...