मीडियाचे (?) उकिरडे....राजकारणी किडे


 मीडियाचे (?) उकिरडे....राजकारणी किडे


हल्लाबोल, टोला, टोमणा, वार, पलटवार

निशाणा, रडार, खाली, वर ....अरे रे रे रे

किती कराल रे बेमानी पैसा प्रसिद्धीसाठी

बाजार बसव्यानी थाटलेल्या दुकानांसाठी


ऐतिहासिक पुरुषांचे गोडवे अन संदर्भ देत

तुम्ही तुमचीच गरळ ओकत आहात सदैव

अडगळीत टाकून  थोरांचे विचार अन तत्व 

तुम्ही माणसातला माणूस केंव्हाच गोठवलाय 


नावानं न ओळखता जात आज ओळख झाली

शेक्सपिअर तुझी वाणी अशी कशी खरी ठरली

घर अन आई बापांची परवड करणारे  हेरलेत

चौकात याच्या त्याच्या जय अन हुजरे गिरी साठी


भडक तुमचे मथळे अन बातमी मात्र वेगळी

या भुलभुलय्या ला अख्खी पिढी गेली बळी

मित्र मित्राचा,  भाऊ भावाचा  राहिला नाही 

अव्याहत तुमच्या या विष पेरणीच्या कार्याने


जो जातो समजावयला त्याचीही जात निघते

झेंड्याखाली त्यालाही गाडल्या जाते कुठे

मुस्कटदाबी करून त्यालाच अडवून थांबवता

रोज पुन्हा तोच खेळ चित अन पट तुमचीच


निर्भीड हा शब्द तुमच्यातुन गेला आहे केंव्हाच

प्रामाणिक शब्द, माणसे काही  राहिलं नाही

उचलली जीभ लावली टाळ्याला हाच मंत्र

या उकीरड्याचा दुर्गंधी ने जनता गुदमरत आहे


समस्या, प्रश्न, अडचणी, यांची सोडवण न करता

विकास, जनहित  बाकी सारं टांगून त्या खुंटीला

कुठे निघाला आहेत सारे या अघोरी  प्रवासाला

तेंव्हा थांबवा सारं, तुमचे सारीपाट आवरते घ्या


शरद पुराणिक

040422

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती