Posts
Showing posts from December, 2021
आज पु ल असते तर ...सहज सुचलंय ...
- Get link
- X
- Other Apps
आज पु ल असते तर ...सहज सुचलंय ... (कोणाच्याही भावना दुखावणे हा हेतू नाही केवळ आठवण म्हणून लिहिलंय याची कृपया नोंद घ्यावी) आज रघु ची आठवण म्हणुन सर्वांनी त्याला श्रद्धांजली वाहिली अन रघु हे व्यक्तिमत्व सतत डोळ्यासमोर घिरट्या घालू लागलं. किती वेगळं आयुष्य जगला तो. मी जन्मल्या पासून जेंव्हा जेंव्हा त्याला भेटलो तेंव्हा तेंव्हा एक निखळ हास्य, हास्याचा गडगडाट, डोळे बारीक करून त्याचं ते हास्य कायम लक्षात राहील. सुपारी अडकित्ता आणि त्याच ते अतुट नातं. इतकं की ती जनू त्याची ओळखच. अन आप्त मंडळीत सर्वांशी अगदी मिळुन मिसळून मनमुराद आनंद वाटणारा रघु दादा म्हणजे खरंच पु लं च्या अनेक व्यक्ती आणि वल्ली च्या यादीत जाऊन बसणारा. अर्थातच त्याच्या या जगण्याच्या मागचे खरे आधार आधी तात्यासाहेब आणि त्यांच्या पश्चात भाऊ, बाळ आणि सर्वांनी त्याचा अगदी पोटच्या मुला पेक्षा ही जास्त जीव लावला आणि त्याची जगण्याची वाट सुकर करून दिली. त्याला स्वाबलंबी बनवण्यासाठी त्याला अगरबत्तीच्या व्यवसायात सहभागी करून त्याचं अर्थार्जन सुरळित केलं. अन्यथा आजच्या व्यवहारी जगात असा सर्व समावेशक विचार करणा...
कोण होतास तु ....,काय झालास तु ...
- Get link
- X
- Other Apps
कोण होतास तु ....,काय झालास तु ... परवाच्या हैदराबाद पुणे प्रवासात एक रहस्यमय व्यक्ती सहप्रवासी म्हणून भेटली आणि त्या क्षणापासुन मी अस्वस्थ आहे...आपण अनेक अशा व्यक्ती पाहतो की जे यशाच्या उंच शिखरावरून इतके खाली येतात की त्या नंतर त्यांचं अस्तित्व अगदी नगण्य, शून्य किंवा अगदी नाहीच. कुठेतरी प्रचंड केस वाढवून, अंगावर मालिन कपडे आणि विचित्र दिसणारे हे लोक ....पण यांच्या आत खुप शिजवुन शिजवुन थिजलेलं अन काळं ठिक्कर पडणारं जगणं....यात काही तरतात, काही स्वतः ला संपवतात तर काही जबाबदाऱ्या संपवुन हे असं जगत राहतात... त्याला अनेकदा नाव विचारण्याचा प्रयत्न केला, सांगितलं नाही, अगदी चार्टवर जाऊन त्याचं नाव ही पाहिलं तर दुसऱ्याच्या तिकिटावर मी प्रवास करतोय असं बिनदिक्कत सांगून म्हणाला तुम्ही टी सी ला सांगितलं तरी हरकत नाही. या सर्वां पलीकडे तो फार अगोदरच पोचला होता ...त्यामुळे भीती वगैरे त्याच्या सावलीलाही नव्हते... एका सुखवस्तु मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला...चांगल्या संस्कारात वाढलेला अन जगतांना काहीही अपेक्षा न ठेवत तसाच सुसाट जगत होता. तुझं माझं कधी केलं नाही... आले ते सर्वस्व...
!! आज हरपलं देह भान, जीव झाला खुळा बावळा !!
- Get link
- X
- Other Apps
!! आज हरपलं देह भान, जीव झाला खुळा बावळा !! खरं तर या विषयावर इतकं लिहिलं गेलंय, कुठे चित्र रूपांत, गीत रूपांत, तना मनात. अवघा महाराष्ट्र "विट्ठल मय" झालाय. त्या मुळे मी कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे. वैष्णवांच्या या मेळाव्यात ही वाळूच्या कणापेक्षाही सूक्ष्म भक्ती त्या अगाध पांडुरंगा चरणी ठेवावी असं आवर्जुन वाटलं. "पालखी" हा समस्त महाराष्ट्राचा एक मोठा सण आहे, त्यात पुणे म्हणजे अगदी कुलक्षेत्र. कारण आदरणीय, वंदनीय, पुजनिय, प्रातःस्मरणीय, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या इथे साधारण 3 ते 4 दिवस असतात. देहू अन आळंदी हे पवित्र तीर्थक्षेत्र नजीकच आहेत. तसं धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक अशी विविध दागिन्यांनी सजलेली ही "पुण्य नगरी" अशा या विविध क्षणी तिचं सौन्दर्य इतकी खुलवुन जाते की विचारूच नका. पण पालखी ही महाराष्ट्राच्या विविध भागांतून निघते. माझं बालपण बीड ला गेलं तिथे "मुक्ताबाई" ची पालखी दर वर्षी येते, आज ही येते पण या कोविड बाबाने गेल्या 2 वर्षात त्याला सुरुंग लावलाय. त...
अस्सल पुणेरी ...आणि ओढून ताणून पुणेकर
- Get link
- X
- Other Apps
अस्सल पुणेरी ...आणि ओढून ताणून पुणेकर सदरील लेख हा कुठल्याही विशिष्ट व्यक्ती, परिवार किंवा प्रसंगावर नाही, यातील सर्व पात्र हे काल्पनिक असुन कोणाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आता या विषयावर इतकं लिहून झालंय, नाट्यरूपात, साहित्य रूपात आणि दस्तुरखुद्द आदरणीय श्री पु ल यांनी प्रचंड लिहिलं आहे त्यामुळे माझा हा केविलवाणा प्रयत्न आहे, पण तो मी थांबवु शकत नाही, नाईलाज आहे. तर गोष्ट अशी आहे मला आता पुणे येथे स्थलांतरित होऊन 18 वर्ष झाली, म्हणजेच दीड तप. अबब अरे बराच काळ झाला की हो. आमची पाळमुळं म्हणजे अस्सल मराठवाडा आणि ते आमच्या आत इतकी ठासून भरलेली आहेत की विचारू नका. बरं आम्ही ते लपवण्याचा ओंगळवणा प्रयत्न ही कधीच करत नाही, केलाही नाही. आता असं का ? हा प्रश्न काहींना पडला असेल तर त्याला तशी अनेक कारणं आहेत. एक तर तुमचा स्वभाव तसा पाहीजे, म्हणजे कसा? ते सांगता नाही येणार. पण ते काही आपल्याला जमलं नाही एवढं खरं. आता हे यश की अपयश हा निर्णय मी अस्सल पुणेरी आणि ओढुन ताणुन पुणेरी यांच्यावर सोडतो. यातलं ...
- Get link
- X
- Other Apps
आज "वकिलांचा" दिवस आहे ...या व्यवसायात माझे काही मित्र, आप्त आहेत ... खरं तर अनेक लोक यातुन जातात ..अनेकजण फसवून लूट करतात ..पण आज ही काही प्रामाणिक मंडळी या व्यवसायात आहेत जे इमाने इतबारे ही सेवा करतात ...खालच्या ओळी त्यांच्यासाठी ...बाकीच्यांना ही देव सुबुद्धी देवो ही न्यायदेवतेला साकडं . @@@ न्यायदान करतो आम्ही विश्वासाने न्याय देवतेचे डोळे बांधुन सत्याला, मिथ्यालाही न्याय देतो सर्वानाच कोणीतरी वाली पाहिजे दोषारोप अन कैद सुटकेच्या चाव्या आम्हीच बांधतो आमच्या कमरेला असला कोट काळा तरी ही विचार मात्र बो सारखे शुभ्र आहेत घेत नसलो फाईल वजनाच्या फिया तरी त्या वेगाने आम्ही सरकवतो कित्येक अशील येतात याचक होऊन आम्हीच अनेकदा त्यांचे आधार होतो कोरे कागद ही न आणणाऱ्या अशिलाला खाऊ पिऊ घालून त्यांच्या केस लढतो वाटलंच कधी तर तो ही फेडतो ऋण धान्य, भाजीपाला असा वानोळा आणुन इथे ना वस्तू ना त्याची किंमत आहे संकटमोचक होऊन सतत जगणं आहे कोण म्हणतं वकिली व्यवसाय आहे ही एक माणुसकीची मोठी संस्था आहे पायरी चढणाऱ्या अन न चढणाऱ्या दोघांचाही उत्तम दुवा असतो वकील अडचणीत ल...
मुंगेरीलाल के हास्यास्पद सपने
- Get link
- X
- Other Apps
मुंगेरीलाल के हास्यास्पद सपने पन्नास वर्षे झाली हो ...पन्नास पन्नास माझी आवडती संख्या ही ...पन्नास संख्या मी कधी पार करत नाही .. संपत्तीचा मोह मात्र सोडणार नाही इतिहासात ही झालेच की राज्याभिषेक बंद दाराआड द्वेष मत्सर न लोभात ते तरी खरे राजघराणे होते स्वराज्यात इथे हे दलबदलू सरडे एकजात सारे स्वराज्यात ही झालेच कट आणि शह लाखोंचा पोशिंदा देव ही यात अडकला बेरजा बेबाक झाल्या की सारेच सरडे मग कच्चे बच्चे कोणीही करा सामील मोहात सत्तेच्या नीती मूल्य फेकली लालची सर्व सत्ताच उलथायला निघाले बोट धर, कुठे पाय धर तर कुठे काय पण कधी तरी ढिल ही पडतेच भंजाळलेले स्वघोषित राजे बेजार पाऊस ऊन वारा नाते गोते बेकार तो फिरतो या दारी त्या दारी शेजारी कुठून कशीबशी एक अवदसा सापडते तिने निदान स्वबळावर राज्य केलंय तुमचं बळ सदैव व्यर्थ वाया गेलं ती ही यांच्याच विचारांची निघाली पुजा प्रथा सर्वानाच तिलांजली दिली सत्ता अन मोहापायी किती कराल हो ही लाचारी आता पाहवत नाही सोयीप्रमाणे निघणाऱ्या टोप्या फेटे अन त्या सोबतच त्यातले विचार रायरंद बहुरूपी न पोतराज बरे निदान हेतु तरी प्रामा...
- Get link
- X
- Other Apps
Dear Readers.... Thank you for sparing your valuable time visiting the blog. However, I see that most of you are reading only articles that are displayed. However, there is a link ARCHIVE on your left-hand side with a drop-down arrow. Please click to it and you can see all of them available to read. Enjoy reading and please do not forget to comment, like. Thanks for your continuous support. Regards Sharad Puranik