गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी

गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी देवपुर्व दशरात्र ममहासोमयाग - 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 जयपूर मंदीर, वृंदावन, उत्तर प्रदेश इवलेसे रोप लावियेले द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी || प्रवर्ग्य फुलला सोमयाग बहरला | वाहता आहुती प्रेमभावें, अग्नी गगनी भिडला || वसुंधरे चे प्रेमे यज्ञीय सेवे देह अर्पियेला |! सृष्टीयेचे रक्षणी याग योजियेला || प्रवर्ग्य फुलला ...सोमयाग बहरला !! माझ्या या पूर्वीच्या अनेक लेख मालिकेतून मी या कार्याविषयी भरपुर लिहिलं आहे. अगदीच ताजे संदर्भ द्यायचे झाल्यास खडकी (बीड) येथे पार पडलेला द्विरात्र अंगिरस सोमयाग, SVYASA विद्यापीठ बेंगलुरु इथे पार पडलेला पशुकाम महासोमयाग यज्ञ सोहळा आणि नंतर लगेच पुणे येथे सतत महिनाभर पार पडलेला दिव्य शिवपूजन सोहळा. त्यात ही त्रिशताब्दी असा अमृतयोग या वर्षी होता ..मोठ्या महाराजांच जन्मशताब्दी वर्ष, सेलूकर घराण्याच्या अग्निहोत्र दीक्षेला ही 100 वर्ष आणि पार्थिव शिवपूजन सोहळ्याची ही 100 वर्ष. या प्रत्येक यज्ञीय आणि इतर अनुष...