गप गुमान खाली बघुन हादड ना - उगाच का टीवल्या बावल्या
गप गुमान खाली बघुन हादड ना - उगाच का टीवल्या बावल्या आजचा विषय माझ्या खवय्येगिरी शी संबंधित आहे. हो मी खादाड आहेच पण फार जास्त हॉटेलींग आम्ही करत नाही...त्या मागे अनंत कारणं आहेत, ते पुढे येईलच. मुळातच आमची जडणघडण अशा वातावरणात झाली आहे जिथे बाहेरचं सोडा पण घरी खाण्यासाठी ही नियमावली होती. काळ बदलला आम्ही पोटापाण्यासाठी मोठ्या शहरात आलो आणि हॉटेल आणि आमचा घरोबा वाढला. नंतर विवाह झाला, मुलं झाली, थोडा विरंगुळा म्हणून कधी तरी बाहेर पडायचं. आधी मंडळी घरीच करू असा आग्रह आज ही धरतात पण मग त्यात वेळ जातो आणि गप्पा, मुलांसोबत वेळ घालणे राहुन जातात ...हो नाही करत बाहेर पडायचे ...आणि कुठेतरी बस्तान बसवायचे. गंमत सुरू होते ती पार्किंग पासून, जिथे जागा असते तिथे तो सुरक्षा रक्षक गाडी लावू देत नाही. त्याच्या शिट्टीच्या तालावर तो नाचवुन त्याला जिथे वाटल तिथे लावायची. हल्ली मला शंका येते की भंडारा, लंघर ला गर्दी नसते एवढी प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेल बाहेर. नंबर लाऊन आवतनाची वाट पाहणे हा एकमेव पर्याय असतो. या दरम्यान ही बरेच मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. आता आम्ही ...