शिवधनुष्य स्पर्शीले आहे, ते पेलवणार ही आहे आणि तो विजयी क्षण आम्ही जगणार ही आहोत.
.jpeg)
श्री यज्ञेशो विजयते !! यज्ञ नारायण भगवान की जय !! शिवधनुष्य स्पर्शीले आहे, ते पेलवणार ही आहे आणि तो विजयी क्षण आम्ही जगणार ही आहोत. !! ज्ञानभक्ती युक्त कर्मवीर व्हा !! !! पराक्रमी पुरुषार्थी धर्मवीर व्हा !! आदरणीय गुरू माऊलीस वंदन करून हा लेखन प्रपंच सुरू करतो. वरील दोन ओळीत या लेखाचा तसा म्हणल तर सार आहे. माझ्या मागिल अनेक लेखनातून "श्रावणमास शिवपूजन" या वर लिहीले आहेच. हा लेख त्याचाच पुढचा भाग आहे आणि असे अजून भाग येतीलच. दोन वर्षांच्या कडीकुलपातुन या वर्षी हा सोहळा करण्याची संधी "शिव सामर्थ्याने, गुरू कृपेने, गुरुबंधूंच्या ओतप्रेत भक्तीने आणि दस्तुरखुद्द गुरू बहु सोमयाजी दीक्षित यज्ञ मार्तंड श्री यज्ञेश्वर सेलूकर जी महाराज" यांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली. खरंतर ही सेवा घेण्यासाठी अनेक शहर / जिल्हे / तालुके तयार होते. त्यात कोविड चा दोन वर्षे सासुरवास यामुळे अनेक जण सरसावले होते. पण हे पुण्याचं दान माउलींनी पुण्याच्या पदरात टाकले आणि आम्ही कृतकतार्थ झालो. हे म्हणजे IPL चं यजमानपद मिळावं तसं काहीतरी. तिथे खेळ, स्पर्धा आणि बरेच काही (?) असत...