Posts

Showing posts from January, 2022

Positive की Negative हा एकच सवाल आहे

Image
 To be or not to be ...that is the question (पुन्हा आदरणीय कुसुमाग्रज यांची माफी मागुन) Positive की Negative हा एकच सवाल आहे या omicron च्या दलदलीत लक्षणं असून ही निर्लज्ज होऊन जगावं बेशरम, बेदरकार भावनेनं आणि फोफवावा आजार याच संक्रमनाने मला, त्याला अन साऱ्यांनाच  आजाराच्या विळख्याने असा फास टाकावा की प्रत्येकाला असावा positive चा शाप पण मग, पण मग त्या  Positive ला ही Negative चं स्वप्न पडलं तर... इथेच मेख आहे...  पुन्हा negative च्या विश्वात प्रवेश करायचा आणि सर्वाना तो प्रसाद देत राहायचं हिंमत होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे विषारी प्रेम अगदी प्रेताच्या निर्जिव पणाने शरीरावर होणारे अत्याचार सतत अहंकाराच्या या लाटेत माणुसकीची विटंबना आणि अखेर quarantine चा शिक्का घेऊन कोंडून घेतो स्वतः ला आपल्याच घरात... विधात्या तू इतका कठोर का झालास? एकीकडे आम्ही ज्यांना जवळ केल ते विसरले, आणि दुसऱ्या बाजूला ते ज्यांनी हा प्रसाद दिला ते ही विसरले पण मग आजराची लक्षणं घेऊन हा संक्रमित देह घेऊन हे करुणाकरा आम्ही कोणत्या डॉक्टर कडे जायचं, कुठल्या इस्पितळात पाय टाकायचे आणि ते आम्हाला...

थांबवा रे त्या चुकीच्या सोंगट्या

Image
  शकुनी आणि मंथरा आहेत हो हयात दुधास लिंबु नासवते तसे हे ही तहहयात डोळे असून ही घरात दडलेले धृतराष्ट्र  अन् तसंच आंधळं पुत्रप्रेम ही आहेच क्षणाक्षणाला घात करणारी मंथरा वृत्ती सतत खेळ खंडोबा करणारे शकुनी आहेत रावण कंस ही आहेत यत्र तत्र सर्वत्र प्रत्येकाची अघोरी अनुष्ठाने सुरूच आहेत फरक हा की, त्यांना असंख्य अनुयायी नव्हते इथे शेकडो हजारो लाखो अंध आहेत त्यांना तर स्वकियांकडून ही विरोध झाला पण हे सर्व सत्ता लालसेचे गुलाम आहेत रामायण, महाभारत उदाहरण आहेत शेवटी विजय कोणाचा झाला सर्वश्रुत आहे बुद्धीजीवी या सदृश लोकांना दृष्टी नाही सत्याची कास धरणं यांना कधी जमलं नाही अति तिथे माती, सर्व श्रेष्ठ देशभक्ती या आणि अश्या असंख्य म्हणी वाचा संतश्रेष्ठ ज्ञानोबा तुकाराम ही वाचा स्वकल्याणा परि राष्ट्रकल्याण मंत्र वेचा थांबवा रे त्या चुकीच्या सोंगट्या नका मारू आयत्या पिठावर रेघोट्या भाचे, पुतणे, सुना, पोरा, बाळांनो काळाची पावलं नीट ओळखा बाबांनो शरद पुराणिक 170122

मैदान गल्ली ....भजनी मंडळ....शाकंभरी ...एक आठवण

Image
मैदान गल्ली ....भजनी मंडळ....शाकंभरी ...एक आठवण गेले काही दिवस झाले काही लिहिणं झालंच नाही, आता काही चुटुपुट काव्य वगळता फारसं काही हातुन घडलंच नाही. ज्यांना याचा त्रास होतो ते किती सुखावले असतील ..बरं झालं बाबा हा एकदाचा थांबलाय, नाही तर काहीतरी रटाळ  लिहुन पाठवतो ते ही हात हात लांब लचक. कधी ते वाचायचं अन उरवठ्यावर पुरवठा त्यावर काही तरी बोटं वाकडे, तिकडे करा, बळजबरी काही तरी प्रतिक्रिया द्या ...किती तो छळ रे बाबा. असो पण काय करणार माझी काही ही खोड मोडत नाही. आज लहानपणीची एक आठवण सतत गिरक्या घेत होती अन मग लिहायला घेतलं. खरं तर अगदीच सामान्य बालपण जगलो आम्ही, आताच्या पिढीला सांगितलं तर हसतात...पण कितीही लिहिलं तरी ते काही संपत नाही. असो.  तर आमच्या बीडच्या मैदान विठोबा गल्लीत महिलांचे एक भजनी मंडळ होतं. आमच्या मातोश्री ही त्याच्या एक अविभाज्य घटक होत्या , आज ही आहेतच, तश्याच गल्लीतील सर्व काकू आत्या मावशी. मैदान विठोबाचे एक छान मंदिर आहे. अतिशय वेगळी रचना. मंदिर एका गाभाऱ्यात, त्या समोर अजून एक छोटा गाभारा (इथे सप्ताह असेल तर उभे राहुन तास तास हजेरी लावण्याची जागा) आणि त्या स...

हा कुठला रे विधात्या न्याय ?? घेऊन गेलास हजारोंची माय 😢😢

 हा कुठला रे विधात्या न्याय ?? घेऊन गेलास हजारोंची माय 😢😢 ती ना खेळली, बागडली तर सतत धडपडली  ऐन बालपणात बोहल्यावर ढकलली गेली झिम्मा खेळण्याच्या वयात झोळ्या बांधू लागली कुशीत झोपायचं आईच्या, ही तर सताड उघडी  असह्य यातनांचा सुरू झाला अघोरी खेळ जसं  दिवस मावळत येते भयाण कातरवेळ पण ती ना डगमगली घाबरली तशीच निघाली पदोपदी अपमान अन सतत नाकारली गेली  कदाचित तिचा पान्हा वेगळाच होता बनवला एक ना दोन, हजारो कोकरांसाठी सजलेला काटेरी जमीन अन उघड्या आकाशाची चादर घर ना दार, असा उघड्यावर तिचा हा संसार या वासरांच्या मायेनं सजवली तिची झोपडी स्वतःच निराधार पण कोकरांचा आधार झाली उपाशीपोटी राहून तान्ह्यांची भूक मिटवत गेली अशी ही माय आज का बरं अशी परागंदा झाली तिच्या मायेला भरती अशी जोरात आली की तिच्या या पवित्र पात्रात ओहोटी नाहीच आली निगरगट्ट ढोंगी जगात  हिचं प्रेम कोरडं नव्हतं ऐर गैर पात्र कुपात्र अनाथ सनाथ भेदभाव नाही अडला तो हिनं उचलला जोडला वाढवला ज्यांनी नाकारलं हेटाळलं होतं तीला पदोपदी  त्यांनीच मिरवला तोरा  डोक्यावर नाचत प्रत्येकाची  वेळ असते कधी ना कधी ...