माझे कही जुने लिखाण .....
आज "वकिलांचा" दिवस आहे ...या व्यवसायात माझे काही मित्र, आप्त आहेत ... खरं तर अनेक लोक यातुन जातात ..अनेकजण फसवून लूट करतात ..पण आज ही काही प्रामाणिक मंडळी या व्यवसायात आहेत जे इमाने इतबारे ही सेवा करतात ...खालच्या ओळी त्यांच्यासाठी ...बाकीच्यांना ही देव सुबुद्धी देवो ही न्यायदेवतेला साकडं . @@@ न्यायदान करतो आम्ही विश्वासाने न्याय देवतेचे डोळे बांधुन सत्याला, मिथ्यालाही न्याय देतो सर्वानाच कोणीतरी वाली पाहिजे दोषारोप अन कैद सुटकेच्या चाव्या आम्हीच बांधतो आमच्या कमरेला असला कोट काळा तरी ही विचार मात्र बो सारखे शुभ्र आहेत घेत नसलो फाईल वजनाच्या फिया तरी त्या वेगाने आम्ही सरकवतो कित्येक अशील येतात याचक होऊन आम्हीच अनेकदा त्यांचे आधार होतो कोरे कागद ही न आणणाऱ्या अशिलाला खाऊ पिऊ घालून त्यांच्या केस लढतो वाटलंच कधी तर तो ही फेडतो ऋण धान्य, भाजीपाला असा वानोळा आणुन इथे ना वस्तू ना त्याची किंमत आहे संकटमोचक होऊन सतत जगणं आहे कोण म्हणतं वकिली व्यवसाय आहे ही एक माणुसकीची मोठी संस्था आहे पायरी चढणाऱ्या अन न चढणाऱ्या दोघांचाही उत्तम दुवा असतो वकील अडचणीत ल...
Comments