ज्याचे त्याचे समूह वेगळे
ज्याचे त्याचे समूह वेगळे
कुठे सगे सोयरे कुठे निराळे
बंधु भगिनी सासर माहेर
घरोघरी हे कोपरा सोहळे
कुठे लेकी जावई ल्योक सून
सख्खे चुलत मावस अन कोण
सर्वात असून ही वेगवेगळे
फांदी फांदीवर वर कावळे
मद मत्सर द्वेष अहंम कटुता
जणू या सत्वगुणांचेच चेहरे
युग बदलले पण हे तसेच
आपल्याच कोषात जगणारे
गावाकडची घरे जशी दुर्लक्षित
तसंच काहीतरी इथेही घडलंय
घरचं सोडून व्याह्याने धाडलंय
समूहाला या व्याधीने पछाडलय
मित्रानो तुम्हीच आता तारणहार
जिथे सदा प्रेमाचा वसंत बहार
बाकी बगीचे आता आवडत नाहीत
माणसं झालीत स्वत्वात रममाण ....
तो यार, दोस्त ....
चलो अपने अड्डे पे चलते है जहा
हसी की दरकार, खुशी का त्योहार
तकरार मे भी ढेरे सारा प्यार है
वही तो बस जीनेका आसार है
ये गलिया या चौबारा यंहा आना न दोबारा
के तेरा यंहा कोई नही .....
शरद पुराणिक
050522
Comments