ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी साद घालिती पुन्हा नव्याने ती मैत्रीची नाती.... होळी धुरवडी च्या रंगांन अंग तरंग जावं भरुन "नाही तर मित्रांनो मी तसाच राहीन घरात बसून* काल संध्यकाळी १२ तास ऑफिस काम करून घरचा रस्ता घेतला....एक दोन चौक गेले अन् अचानक चौफेर गर्दी दिसायला लागली.... एरवी दोन चार बस, travels असं चित्र असत पण आज गर्दी का आहे हे काही कळेना. हेल्मेट च्या आत डोकं फार विचार करू देत नव्हतं, त्यात एरविच जीव गुदमरून सोडणारी ती वाहनांची अन् माणसांची गर्दी ही काही पुणेकरांसाठी नवीन नाही....पण आज जरा जास्त जाणवत होती... नंतर लक्षात आलं शनिवार रविवार ला जोडून होळीची सुटी आली. .. मग कामगार तो कुठल्याही हुद्द्यावर का असेना लगेच घर जवळ करतो...म्हणून चौफेर बॅगा, पिशव्या, सामान घेतलेले सर्व वयोगटातील लोक होते. पिशिवितून पिचकाऱ्या, मिठाई, असं काही नाही घेऊन निघाले होते. कोणाची चिल्ले पिल्ले सोबत होती, तर कोणाची बहुधा दाराकडे टक लाऊन वाट पाहत असतील. तर कुठे आई वडिलांना भेटण्याची उत्सुकता दिसत होती चेहेऱ्यावर. तर कुठे नोकरीनिमत्ताने बाहेर असलेल्या नवरा बायकांच्या भा...
Comments