माझा औंगाबाद ऋणानुबंध अन सुखावणारे क्षण...
माझा औंगाबाद ऋणानुबंध अन सुखावणारे क्षण... या पूर्वी मी नोकरीनिमित्त विविध शहर आणि राज्यात भटकत भटकत अनंत अनुभव आणि त्याच्या गमती जमती एका लेख मालिकेत गुंफूल्या आहेत. आज ही आठवण झाली की वहितील झाकून ठेवलेले ते मोरपीस मी उघडुन पाहतो. परवाच काही प्रासंगिक कार्यास उपस्थित राहण्यासाठी निघालो. गाडी चालवताना ते आठवांचे मोरपीस सारखे पिंगा घालत होते. माणुसकी, आपलेपण आणि जात धर्म या पलीकडे जाऊन एका रेशमी धाग्यात गोवलेले ऋणानुबंध अनुभवताना होणारा आनंद शब्दात साठवता येत नाही, तरीही ती अनुभूती द्यावी असं राहून राहून वाटलं आणि त्यासाठी हा प्रपंच. माझ्या प्रत्येक भेटीत मी यातील जसे जमतील तसे भेटीचे सोहळे घडवतो. वास्तविक ती यादी एवढी मोठी आहे की अशी एका लेखात समावणारी नाहीच. आलिशान परफ्यूमस - हे आमचं हक्काचं दुकान. हे तुमच्या रस्त्यात पडत नाही, तिथे मुद्दाम जावं लागत. रोशन गेट वरून शहागंज भागात जाताना डाव्या हाताला ही छोटीशी सुगंधी अत्तराची एक दुकान. गेली 25 वर्षांहून अधिक काळ मी जो काही भला बरा दरवळलो तो याच दुकानातून घेतलेल्या विविध अत्तराच्या फाया ...हो फाया चा तो जमान...