नित्य आचरणात "अग्निहोत्र"
💥🔥🌈🔥💥 नित्य आचरणात "अग्निहोत्र" ॐ अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्।। अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक यज्ञ आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. हिंदू धर्मातल्या विविध परंपरांपैकी एक म्हणजे अग्निहोत्र. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक. अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं. अग्निहोत्राच्या माध्यमातून सूर्य आणि चंद्राद्वारे प्राप्त होणार्या उच्च शक्तीयुक्त ब्रह्मांड ऊर्जेला योग्य पद्धतीने ग्रहण करता येऊ शकतं. अग्निहोत्राशी संबंधित बरंच संशोधनही करण्यात आलं आहे. अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करायला हवं. अग्निहोत्र हा मानवी शरीरासाठी, उत्तम आयुरारोग्य आणि परिपूर्ण जीवनशैली साठी एक रामबाण व्रत, उपाय, पद्धत आहे. त्याचं आचरण आपल्या दिनचर्येत नित्य, प्रातः, आणि सायंकाळी करावे. दीर्घायुष्य आणि निरोगी सौष्ठव या साठी हे अत्यंत लाभप्रद असे आचरण आहे. सृष्टीची जी पाच तत्व आहेत - अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश - या सर्वां मध्ये अग्नीचा उल्लेख प्रथम आहे कारण तो श्रेष्ठ आहे. तसे अग्निहोत्र आचरण आणि...