इथे ओशाळला निषेध
इथे ओशाळला निषेध शब्दांनाही किळस वाटावी इतके निर्लज्ज झालोय आम्ही तिसरीच्या इतिहासाच पान इतक्या तुकड्यात दुभंगलय त्या फोटोतल्या प्रत्येकांना गावच्या कोपऱ्यात बसवलय अवडतीचे न नावडतीचे सारे वसले आहेत डसण्यासाठी साला तो प्लेग बरा होता हो एवढा हा द्वेषाजार दुर्धर आहे ते झटक्यात मरण बरं होतं हे रोज तडफडणं नको झालंय कोरोनाही जायला नको होता माणुसकी चा जीर्णोद्धार होत होता उध्वस्त वास्तू नव्यानं उभारतात तसं जे गेले अनंत त्या वेदना आहेतच शब्द भावना व्यक्त अन अव्यक्त स्वार्थी दुष्ट अज्ञान असा दर्प दुर्गंध राग लोभ द्वेष मत्सर यांचा हैदोस इतकं टोकाचं ? शब्द ओशाळलेत सामान्य, राजकारणी, पत्रकार मी तुम्ही ते आणि हे सारेच पछाडलेले या दुर्धर आजाराने या महामारीला औषध काय ?? असा खिन्न झालो की आठवतात शाळेत दिलेली जयंती ची भाषणं जणू प्रत्येक जण अंगात संचारल्यागत ते इतिहासाचं पान शोधतोय मी ... शरद पुराणिक रायचूर, कर्नाटक 201122