अंब्या हापुसा हस रे ..तुला एवढा भाव का रे

अंब्या हापुसा हस रे ..तुला एवढा भाव का रे एक खाऊ म्हणून जातो, भाव पाहून थांबतो रे त्यानं जीभ ही मधाळ होत नाही, तुला काय रे ? कधी घेईन डझन भर, कधी रस तो पोटभर ? पेट्या पिशव्या सर्वच वाट पाहात आहेत रे कोपरे कापरे बाल्कन्या सारं सारं मोकळं रे रसाचे पातेले, टोपले, केर टोपली रीती रे रसाळणारे हात ही भिजण्यासाठी आतुर रे एकीकडे सूर्य अन तुझे भाव जणु आग रे शरीराला , खिशाला न परवडणारे हे सारे नको ये फळांच्या राजा अंत आता पाहू रे तुझे भाव न सूर्याची गर्मी दोन्ही उतरु दे रे शरद पुराणिक अंबा प्रेमी 300422