माफ करा महाराज.
माफ करा महाराज...आम्ही स्वार्थी झालोत तुम्हाला ज्या गुचक्या लागत आहेत ..त्या साठी क्षणाक्षणाला तुमच्या नावाचा उल्लेख होतोय निष्ठेचा, स्वराज्याचा, कर्तव्याचा इतिहास विसरुन ज्यांना साधी ABCD येत नाही ते ही यात आहेत Polarisation ध्रुवीकरण या शब्दाचा आधार घेत उच्चारताना ही यातना आहेत त्याचा जप होत आहे भक्त, अंध आणि काय काय हिणवत आहेत खुर्ची सम्राट घट्ट धरून घरीच आसनस्थ आहेत विविधरंगी दोऱ्या त्याला बांधुन ती घट्ट करत पण गाठीच त्या कधीतरी सुटणार ताणून ताणून गाठीचा पीळ आवळत थकलेले हात ही निसरडे तुमचा, फुले, आंबेडकर आणि कोणा कोणाचा कधी यांचा तर कधी त्यांचा महाराष्ट्र नक्की कोणाचा सवडीचा अन सोयीस्कर उपयोग तुमचा सर्वांचा गुचकी लागत असेल हो तुम्हा सर्वांना या साऱ्यात तुम्ही सर्व दैवत एकत्र या जिथे असाल तिथे एकदा अन या खुर्ची सम्राटांना कळवा तो निरोप कसातरी सुराज्य, सुशासन आणि स्वराज्य याचा पाठ शिकवा रंगांचा आणि भेदाचा हा भयाण खेळ थांबवा एकदाचा .. आता तरी देवा मला पावशील का हे सर्व अघोरी थांबवशील का ? शरद पुराणिक 190322